अपारशक्ती खुराना अन् रोहित शर्माची जमली गट्टी; धमाल मस्तीचा व्हिडिओ व्हायरल…

अपारशक्ती खुराना अन् रोहित शर्माची जमली गट्टी; धमाल मस्तीचा व्हिडिओ व्हायरल…

Aparshkati and Rohit Sharma : बॉलीवूडचा प्रतिभावान असा अभिनेता म्हणजे अपारशक्ती खुराना ( Aparshkati Khurana ) आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांच्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये स्टेजवर चांगली गट्टी जमली होती. या दोघांच्या या धम्माल मस्तीचा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.

मित्राला दिलेला दम पवारांनी लक्षात ठेवला… शेळकेंना त्यांच्याच मतदारसंघात जाऊन दिली तंबी

या व्हिडिओमध्ये क्रिकेटचा सामना सुरू असताना स्टम्प माईकमध्ये कॅच केल्या जाणाऱ्या खेळाडूंच्या संवादांवर मीन्स बनत असल्याचं अपारशक्तीकडून रोहित शर्माला विचारण्यात आलं. त्यावर रोहित म्हणाला की, माईक हा लोकांसाठी चांगला आहे मात्र आमच्यासाठी नाही. मात्र मी मैदानावर बोलत असलेल्या अनेक गोष्टी अद्याप लीक झालेल्या नाहीत. त्यावर अपारशक्तीने विनोदी शैलीत रोहितला म्हटलं की, या मंचावर येत्या गोष्टी क्लिक कर. मात्र रोहित ने मिश्किलपणे उत्तर देत म्हटलं की, आता नाही करणार धर्मशाला सामन्यानंतर करेल. त्यांच्या या रंगात गप्पांवर प्रेक्षकांमध्ये देखील हसू पिकले होते.

केरळनं मारली बाजी; भारतातील पहिले सरकारी मालकीचे OTT प्लॅटफॉर्म ‘C Space’ लॉन्च

अपारशक्ती आणि रोहित शर्मा बिलासपूर येथे पार पडलेल्या संसद खेल महाकुंभ कार्यक्रमात सहभागी झाले होते. कामाच्या आघाडीवर अपारशक्ती यावर्षी विविध प्रकल्पांमध्ये दिसणार आहे. तो त्याच्या 2018 च्या ब्लॉकबस्टर ‘स्त्री’ च्या सिक्वेलमध्ये त्याचे सर्वात प्रिय पात्र बिट्टूची पुनरावृत्ती करणार आहे. त्याच्याकडे ॲप्लाज एंटरटेनमेंटचा ‘फाइंडिंग राम’ नावाचा डॉक्युमेंटरी देखील आहे, तर अतुल साबेरवाल दिग्दर्शित त्याचा ‘बर्लिन’ हा चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये तरंग निर्माण करत आहे. ‘बर्लिन’ मध्ये, तो कबीर बेदी, राहुल बोस आणि इश्वाक सिंग यासारख्या कुशल अभिनेत्यांसोबत स्क्रीन स्पेस शेअर करणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube