One Terrorist Killed In Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम (Jammu Kashmir) जिल्ह्यातील अखल भागात शुक्रवारी संध्याकाळपासून सुरू झालेलं दहशतवादविरोधी मोहीम अजूनही सुरू आहे. या कारवाईदरम्यान लष्कराच्या जवानांनी एका दहशतवाद्याला ठार (Kulgam Encounter) केलं असून, भागात अजून दोन ते तीन दहशतवादी लपले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांच्या हालचालींबाबत गुप्तचर यंत्रणांकडून माहिती मिळाल्यानंतर, भारतीय लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि (Terrorist Killed In Jammu Kashmir) सीआरपीएफ (केंद्रीय राखीव पोलीस दल) यांच्या संयुक्त पथकाने दक्षिण काश्मीरच्या घनदाट जंगली परिसरात घेराबंदी करत शोधमोहीम सुरू केली.
दहशतवाद्यांकडून गोळीबार, लष्कराचं प्रत्युत्तर
शोधमोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी अचानक अंदाधुंद गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनी तात्काळ प्रत्युत्तर देत जोरदार कारवाई केली. या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार मारण्यात यश मिळालं आहे. लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरात अजूनही लष्कर-ए-तैयबा (LeT) या दहशतवादी संघटनेशी संबंधित दोन ते तीन दहशतवादी लपून बसले असल्याची शक्यता आहे.
घेराबंदी अधिक मजबूत, अतिरिक्त फौज तैनात
परिसरात रात्रभर दहशतवाद्यांकडून मधूनमधून गोळीबार सुरू होता. त्यामुळे संपूर्ण परिसराची घेराबंदी अधिक कडक करण्यात आली आहे. अतिरिक्त सैन्यही घटनास्थळी पाठवण्यात आले असून ऑपरेशन अजूनही सुरू आहे.लष्कराकडून खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. दहशतवाद्यांचा पूर्णपणे नायनाट होईपर्यंत ऑपरेशन चालू ठेवले जाईल, असा संदेश लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे.
PM Kisan Yojana : गुडन्यूज! 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार 2000 रुपये
स्थानिक नागरिकांना सतर्कतेचं आवाहन
दरम्यान, परिसरातील नागरिकांना घरातच सुरक्षित राहण्याचं आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास लगेच पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. कुलगाममधील ही मोहीम येत्या काही तासांत निर्णायक टप्प्यावर पोहोचण्याची शक्यता असून, संपूर्ण देशाचे लक्ष या ऑपरेशनकडे लागलेलं आहे. यापूर्वी 30 जुलै रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ येथे दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावण्यात आला होता. लष्कराच्या जवानांनी दोन सशस्त्र दहशतवाद्यांना ठार मारले. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, चकमकीत मारले गेलेले हे दोन्ही दहशतवादी पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनेचे लष्कर-ए-तैय्यबाचे सदस्य असल्याचे मानले जात आहे.
या चकमकीच्या दोन दिवस आधी, सुरक्षा दलांनी श्रीनगरमधील जंगलात पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन दहशतवाद्यांना ठार मारले. बुधवारी करण्यात आलेले शिवशक्ती नावाचे ऑपरेशन पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांच्या योजनांना मोठा धक्का असल्याचे लष्कराने म्हटलंय. लष्कराच्या म्हणण्यानुसार, या संघटना जम्मू आणि काश्मीरमध्ये सतत दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देत आहेत.