Download App

Video : अंगावरची ओली हळद अन् हातावर रंगलेली मेहंदी; लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी ‘जवान’ बॉर्डरवर…

मनोजला फोन आला अन् सर्व सुट्ट्या तुर्तास रद्द करण्यात येत असून तु कामावर रुजू व्हावस असं सांगितलं गेल. त्याच क्षणाला मनोजने

Operation Sindoor : रक्ताचं नात असो, प्रेमाचं नात असो वा भावनेचं नात असो या सगळ्या नात्यांना बाजूला सारून आपल्याला समर्पणाचं बळ देणार एकच नात अन् एकच प्रेम म्हणाजे भारत देशाची सेवा. (Sindoor) भारत देशाच्या सेवेसाठी अनेक ‘आपल्या’ म्हटल्या जाणाऱ्या गोष्टी गौन ठरतात किंबहुना त्या दुय्यम स्थानी असतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हा हे सगळ का सांगतोय. तर कधी अन् कुणावरच वेळ येऊन नये अशी वेळ सध्या निर्माण झाल्याची स्थिती आहे. ती म्हणाजे भारत-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती. तसं, कोणतही आणि कधीही संकट आलं तरी त्याला तोंड द्यायला भारत मातेचा ‘जवान’ सुपुत्र कायम तटस उभा असतो. त्यामुळे तो सध्याच्या परिस्थितीतही कसा मागं राहील?

तर झालं अस की, गेल्या काही दिवसांपासून भारत अन् पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे. पहलगामच्या दुर्दैवी दहशतवादी हल्ल्यानंतर वार-प्रतिवार सुरू झाले. दरम्यानच्या काळात आपला जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील भारत मातेचा सुपुत्र मनोज पाटील याच्या नव्या आयुष्याचा आरंभ नुकताच झाला होता. नव्या म्हणजे त्याच्या आयुष्यभराची साथीदार त्याची अर्धांगिनी येऊन अवघे तीन दिवस झाले होते. नव्या स्वप्नांच्या नव्या आकांक्षांत तो वावरत असतानाच भारत भूमिला आपल्या जवानांची गरज भासली.

Operation Sindoor : जम्मूच्या सांबा सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न फेल; जैशचे १० ते १२ दहशतवादी ठार

मनोजला फोन आला अन् सर्व सुट्ट्या तुर्तास रद्द करण्यात येत असून, तु कामावर रुजू व्हावस असं सांगितलं गेल. त्याच क्षणाला मनोजने आपल्याला निघावं लागेल. जरी हळदीचं अंग असलं तरी आज माझ्या भारत भूमिला माझी सक्त गरज आहे या विचाराने त्यांने आपला परतीचा रस्ता धरला. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे गावातील मनोज न्यानेश्वर पाटील अन् नाचणखेडे येथील रामचंद्र पाटील यांची कन्या यामिनी यांचा ५ मे रोजीच विवाह संपन्न झालाय.

तसा विचार केला तर मनोज हा लग्नाची सुट्टी म्हणून एक-दीड महिना सुट्टीवर आला होता. मात्र, अचानक सुरू झालेल्या या युद्धजन्य परिस्थिीने त्याची गरज भासली अन् कसलाच विचार न करता तो आनंदाने आपल्या कामावर निघाला. मात्र, त्याला वाट लावताना त्याच्या जन्मादात्या आई-वडिलांसह मित्र परिवार अन् पुढचं संपूर्ण आयुष्य मनोजसाठी वाहिलेल्या यामिनीचे डोळे आश्रुंनी डबडबले होते. परिस्थिती सहज असताना आनंदाने वाट लावणारे सर्वजण यावेळी मात्र, मनात धाकदुक ठेवून मनोजला वाट लावत होते.

यावेळी डोळे भरून येतील अन् अवंढा बळच गिळावा लागेल अशी मनोजचीही अवस्था झाली होती. मात्र, भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणत्याही क्षणी युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे आपल्या भारत मातेच्या सेवेत रुजू व्हायचंय अन् आपलं कर्तव्य बजवायचय हेच मनोजच्या डोळ्यात दिसत होतं. अंगावरची ओली हळद आणि हातावर रंगलेली मेहंदी घेऊन मनोज आज आपल्या पोस्टिंगच्या ठिकाणी रवाना झाला. मनोजने घेतलेल्या या धाडसी अन् कर्तव्यपर निर्णयामुळं सर्वत्र कौतुक होत आहे.

follow us