Pahalgam Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल मंगळवारी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली असून दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. पहलगाम दहशतवादी (Pahalgam Attack ) हल्ल्यात आतापर्यंत 27 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी सहा पर्यटक महाराष्ट्राचे आहे.
या धक्कादायक घटनेनंतर सोशल मीडियावर (Social Media) अनेक व्हिडिओ व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये दहशतवाद्यांनी लोकांना धर्म विचारुन त्यांच्यावर गोळ्या झाडले असा दावा करण्यात येत आहे. तर दुसरीकडे या हल्ल्यात जखमी झालेल्या एका महिलेने, दहशतवाद्यांनी फक्त धर्म विचारुन त्यांच्या पतीची हत्या केली असा दावा केला आहे. दहशतवादी हल्ल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर काही नेते मंडळीकडून हिंदू – मुस्लिम राजकारण करण्यात येत आहे.
तर आता आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला असून या व्हिडिओमध्ये काश्मीरमधील लोक मीडियाविरोधात आंदोलन करताना दिसत आहे. तसेच गोदी मीडिया गो बॅक चे नारे देण्यात येत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडियोमध्ये काश्मीरमधील लोक एका हिंदी मीडिया चॅनेलच्या प्रतिनिधीविरोधात काश्मिरी तरुण आंदोलन करताना दिसत आहे. तसेच या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या लोकांनी मीडियावर गंभीर आरोप लावत मीडिया फक्त टीआरपीसाठी अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे असा दावा केला आहे.
श्रीनगर में चित्रा त्रिपाठी का विरोध।
‘गोदी मीडिया मुर्दाबाद’ के नारे लगे। pic.twitter.com/sPSI5DGYgz— अश्विनी सोनी اشونی سونی (@Ramraajya) April 23, 2025
आम्ही म्हणत आहोत शांतता असावी मात्र मीडिया हे दाखवत नाही असा दावा देखील या व्हायरल व्हिडिओमध्ये करण्यात येत आहे. मंगळवारी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला असून सरकारने दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ला, एकाच दिवसात तब्बल 70% टूर रद्द; अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम
“गोदी मिडिया” हाय हाय
कश्मीरी कह रहे हैं कि अमन की बात करो।
नफरत न फैलाओ… एंकर चित्रा त्रिपाठी !! pic.twitter.com/J35igEh1Y9— 𓂆 چاندنی (@Chandnii__) April 23, 2025
पाच लाखांची मदत जाहीर
मंगळवारी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. या दहशतवादी हल्ल्यात ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांना सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपये देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आली आहे.