दहशतवाद्यांनी ओळख तपासणे, हा PM मोदींना संदेश; पहलगाम हल्ल्याचा संबंध रॉबर्ट वाड्रांनी हिंदुत्वाशी जोडला

दहशतवाद्यांनी ओळख तपासणे, हा PM मोदींना संदेश; पहलगाम हल्ल्याचा संबंध रॉबर्ट वाड्रांनी हिंदुत्वाशी जोडला

Robert Vadra Connect Pahalgam Attack To Hindutva Politics : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकलं. या हल्ल्यावर सत्ताधारी अन् विरोधी पक्षातील सर्व नेत्यांनी वक्तव्य केलंय. दरम्यान या प्रकरणाबाबत काँग्रेस (Congress) नेत्या प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांचं (Robert Vadra) वादग्रस्त विधान समोर आलंय. त्यांनी म्हटलंय की, देशात असलेल्या मुस्लिमविरोधी वातावरणामुळे हा हल्ला झाला. रॉबर्ट वाड्रा यांचं हे विधान सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल बोलताना रॉबर्ट वड्रा यांनी ‘मुस्लिमांना कमजोर वाटतंय’ असं वक्तव्य केलंय. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. काश्मीरच्या ‘मिनी स्वित्झर्लंड’मध्ये सुट्टीचा आनंद घेत असलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. रॉबर्ट वाड्रा यांनी म्हटलंय की, भारतात (PM Modi) अल्पसंख्याकांना अस्वस्थ आणि त्रासदायक वाटतंय. वाड्रा यांनी यासाठी भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या हिंदुत्वाच्या (Hindutva Politics) आग्रहाला जबाबदार धरलंय.

Video : ‘जय हिंद’! नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या पत्नीच्या दोन शब्दांनी संपूर्ण देश गहिवरला…

आपल्या देशात सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतं आहे. त्यामुळे अल्पसंख्याकांना त्रास होतोय. जर तुम्ही घडलेल्या या दहशतवादी कृत्याचे विश्लेषण केले तर, जर ते (दहशतवादी) लोकांची ओळख पाहत असतील, तर ते असे का करत आहेत? कारण आपल्या देशात हिंदू आणि मुस्लिमांमध्ये एक फूट निर्माण झाली आहे, असं वाड्रा यांनी म्हटलंय.

त्यांनी पुढे असं म्हटलंय की, दहशतवाद्यांनी ओळख तपासणे आणि हिंदूंना मारणे, हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक संदेश आहे. या प्रकारच्या संघटनांना वाटतंय की, हिंदू सर्व मुस्लिमांसाठी समस्या निर्माण करीत आहेत. ओळख पाहून नंतर एखाद्याला मारणे, हा पंतप्रधानांना संदेश आहे, कारण मुस्लिम कमजोर झाल्याचं वाटत आहे. अल्पसंख्याक कमकुवत वाटत आहेत, हे वरच्या पातळीवरून येत असावं. जेणेकरून आपण आपल्या देशात सुरक्षित आणि धर्मनिरपेक्ष आहोत, असं वाटावं. जेणेकरून आपल्याला अशा प्रकारचे कृत्य घडताना दिसणार नाहीत.

पाकिस्तान मुर्दाबाद! दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा, कॉंग्रेसकडून भ्याड हल्ल्याचा निषेध

भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी त्यांच्या एक्स हँडलवर व्हिडिओ शेअर केलाय. त्यांना वाड्रा यांच्या या टिप्पणीवर धक्का बसला आहे. मालवीय यांनी लिहिलंय की, धक्कादायक! सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा निर्लज्जपणे दहशतवादी कृत्याचे समर्थन करतात. दहशतवाद्यांना निषेध करण्याऐवजी त्यांना कव्हर करत आहेत. उलट पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या अत्याचारांसाठी भारतावर दोषारोप करत आहेत. मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांच्या गटावर गोळीबार केल्यानंतर एका दिवसात वाड्रा यांचे हे विधान आलंय, असं देखील मालवीय म्हणाले आहेत.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube