Video : ‘जय हिंद’! नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या पत्नीच्या दोन शब्दांनी संपूर्ण देश गहिवरला…

Video : ‘जय हिंद’! नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या पत्नीच्या दोन शब्दांनी संपूर्ण देश गहिवरला…

Navy Officer Vinay Narwal Wife Himanshi Emotional Video : पहलगाम येथे दहशतवाद्यांनी मारलेल्या पर्यटकांमध्ये (Pahalgam Terror Attack) लेफ्टनंट विनय नरवाल यांचा समावेश आहे. त्यांचे पार्थिव मायदेशी आणण्यात आले. यावेळी भारतीय नौदलाच्या वतीने (Jammu Kashmir) त्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी पत्नी हिमांशीने वीरगती प्राप्त केलेल्या आपल्या पतीला ‘जय हिंद!’ म्हणत अखेरचा निरोप (Vinay Narwal Wife Video) दिलाय.

नौदलाचे लेफ्टनंट विनय नरवाल पत्नी हिमांशीसोबत हनिमुनसाठी गेले होते. दोघांनी सहा दिवसांपूर्वी 16 एप्रिल रोजी मसुरी येथे डेस्टिनेशन वेडिंग केले. हिमांशी ही गुरुग्रामची रहिवासी (Vinay Narwal Wife Emotional Video) आहे. लग्नाच्या स्वागत समारंभानंतर ते जम्मू काश्मीरला रवाना झाले होते. मात्र, 22 एप्रिल रोजी मंगळवारी दुपारी दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

Pahalgam Terror Attack : पाकिस्तानला धडकी; इलाका तुम्हारा धमाका हमारा, भारताकडून मोठे संकेत

हल्ल्यानंतरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यामध्ये लेफ्टनंट विनय (Vinay Narwal0 जखमी अवस्थेत पडलेले दिसत आहेत, तर जवळ बसलेली हिमांशी रडत आहे. फोटो पाहून लोक भावनिक झाले. त्यानंतर आता पुन्हा एक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे. या व्हिडिओमध्ये हिंमाशी आपल्या वीरगती प्राप्त केलेल्या पतीच्या मृतदेहासमोर टाहो फोडताना दिसत आहे. नौदलाने भारतीय नौदलाचे लेफ्टनंट विनय नरवाल यांना मानवंदना दिली.

यावेळी हिमांशीने पतीच्या पार्थिवाला सॅल्यूट करत मानवंदना दिली. ‘आय एम प्राऊड ऑफ यू विनय इव्हरीटाईम जय हिंद…’ असे म्हणत तिने टाहो फोडत अश्रूंना वाट मोकळी करून दिली. व्हिडिओत दिसतंय की, दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या विजय नरवाल यांना पत्नी हिमांशीकडून भावनिक होत अखेरचा निरोप देण्यात आलाय. त्यांच्या दोन शब्दांनी अख्खा देश गहिवरला आहे. हिमांशी ढसाढसा रडत आहे. त्याच्या पार्थिवापुढे वारंवार मान झुकवतेय. मला तुझा खूप अभिमान आहे, असं देखील ती म्हणतेय.

‘हेल्पलाइनशी संपर्क साधा’…. काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी CM फडणवीसांचा अॅक्शनमोड, क्रमांक जारी

विनय आणि हिमांशी यांचे लग्न या वर्षी 16 एप्रिल रोजी मसूरी येथे झाले होते. रिसेप्शनच्या फक्त दोन दिवसांनी ते हनिमूनसाठी जम्मू आणि काश्मीरला रवाना झाले. परंतु मंगळवारी पहलगाममध्ये पत्नी हिमांशी दहशतवाद्यांच्या गोळ्यांमधून वाचली, विनयला मात्र आपला जीव गमवावा लागला. त्यांचे संपूर्ण कुटुंब दुःखात बुडाले आहे. विनय हा त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. घरातलं आनंदी वातावरण काही क्षणांत दुःखात बदललं आहे.

या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा सौदी अरेबिया दौरा अर्ध्यावरच सोडून परतले आहेत. पंतप्रधान मोदींनी या घटनेचा तीव्र निषेध केलाय. त्यांनी आज सकाळी सौदी अरेबियाहून विमानतळावर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी भेट घेतली. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीवर चर्चा केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube