‘…तर कारवाई होणार’ नागपुरात सोशल मीडियावर पोलिसांची नजर, रिल्स बनवणाऱ्यांना सक्त ताकीद

Police Crackdown Social Media Restrictions Nagpur Violence : नागपूर हिंसाचार प्रकरणी (Nagpur Violence) मोठी अपडेट समोर आली आहे. नागपुरात 17 मार्च रोजी मोठा हिंसाचार उसळला होता. याप्रकरणी पोलिसांनी 50 दंगलखोरांवर गुन्हा दाखल केले होते. याप्रकरणी फहीम खान नावाच्या व्यक्तीला 18 मार्च रोजी अटक देखील करण्यात आली (Social Media Restrictions) होती. सहा दिवसांनंतरही 9 पोलीस ठाण्यांच्या क्षेत्रात कर्फ्यू लागू होता. तो सध्या हटवण्यात आला होता. त्यानंतर आता नागपुरात सोशल मीडिया वापरण्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत. तर रिल्स बनवणाऱ्यांना पोलिसांनी सक्त ((Nagpur News) ताकीद दिली आहे.
नागपुरात झालेल्या हिंसाचार झाल्यानंतर आता पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. तसेच त्यांनी रिल्स बनवणाऱ्यांना देखील सक्त ताकीद दिलीय. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Visit) यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने तयारी सुरू केली असल्याचं देखील त्यांनी सागितलं आहे.
Gold Smuggling : हवालाच्या पैशाने सोने खरेदी केलं, रान्या रावची मोठी कबुली
युट्यूबवर आमची नजर असणार, असा इशारा देखील पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी दिलीय. दोन समाजात तेढ निर्माण होईल किंवा कोणाच्याही प्रतिष्ठेला धक्का लागेल, असे व्हिडिओ हिंसाचाराच्या घटनेनंतर कोणीही युट्युबवर पोस्ट करू नका अशा सूचना दिल्या आहेत. असे व्हिडिओ अपलोड किंवा व्हायरल केल्याचे आढळताच, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. आतापर्यंत याप्रकरणी 13 जणांविरोधात तक्रार दाखल केली असून आणखी काही लोकांना अटक करण्यात येत असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.
नागपूरमधील हिंसाचाराला जबाबदार असलेल्यांना शिक्षा करण्यात कोणालाही सोडले जाणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं. ही एक सुनियोजित घटना आहे. यावेळी झालेल्या दगडफेकीत पोलिसांसह अनेक जण जखमी झाले होते. तपासादरम्यान, नागपूर सायबर पोलिसांना अशा काही इंस्टाग्राम आणि सोशल मीडिया पोस्ट आढळल्या. अटक करण्यात आलेल्या आरोपी फहीम खानने यापूर्वी त्याच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पोस्टवर हिंदू धर्माविरुद्ध अनेक आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचंही तपासात समोर आलंय.