Download App

Pahalgam Terror Attack : मोदींच्या फ्री हँडमुळे अधिक आक्रमक होते इंडियन आर्मी; वाचा आतापर्यंतचा इतिहास

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर कारवाईसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्य दलाला फ्री हॅन्ड दिल्याने पाकिस्तानसह चीनला चांगलीच धास्ती लागलीयं.

Pm Narendra Modi On Pahalgam Attack : पहलगाम दहशतवादी (Pahalgam Attack) हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातून संतापाची लाट उसळत आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये 28 जणांना ठार केल्यानंतर भारताकडून पाकिस्तानविरोधात धोरण आखलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि तिन्ही सैन्यदलाच्या प्रमुखांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मोदींनी सैन्य दलांना फ्री हॅन्ड दिला आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी पाकिस्तानवर हल्ला होण्याची शक्यता आहे.

VIDEO : मनोज जरांगे पुन्हा अ‍ॅक्टिव्ह; उपोषणाची तारीख ठरली, मुंबई पुन्हा चक्काजाम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधीही सैन्य दलाला फ्री हॅन्ड दिलेला आहे. याआधी जम्मू-काश्मीरमधील पुरी आणि पुलवामा हल्ल्यानंतर कारवाई करण्यासाठी फ्री हॅन्ड दिला होता. तसेच गलवान व्हॅलीमध्ये चीनसोबत 2020 मध्ये झालेल्या संघर्षादरम्यानही सैन्य दलाला फ्री हॅन्ड दिला होता.

उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईकची कारवाई :
जम्मू काश्मीरमधील उरीमध्ये 2016 साली पाकिस्तानी दहशतवाद्यांनी सैन्यदलाच्या छावणीवर हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये 18 सैनिक शहीद झाले होते. त्यानंतर पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी भारताने ठोस पाऊले उचलले होते. यावेळीही सैन्य दलाला फ्री हॅन्ड दिला होता. त्यानंतर संपूर्ण देश कारवाईची मागणी करत असतानाच भारताने सर्जिकल स्ट्राईक करत दहशतवाद्यांचे अड्डे उद्धवस्त केले होते.

आत्महत्येच्या अर्धा तास आधी चौघांना फोन, दिवसभरात 27 कॉल्स; डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरणी मोठं अपडेट

पुलवामामध्ये 2019 साली दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातून कारवाईची मागणी करण्यात आली होती. पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला योग्य उत्तर देण्यासाठी लष्कराला मोकळीक दिली होती. हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, दहशतवाद्यांना केव्हा, कुठे आणि कोणाला शिक्षा द्यायची हे परिस्थिती हाताळण्यास सक्षम असलेल्या आपल्या सैन्याने ठरवले पाहिजे.

दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानविरोधात ठोस पाऊले उचलले असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. भारताने सिंधू नदीच्या पाण्याबाबत मोठा निर्णय घेतलायं. त्यानंतर देशभरातील नागरिकांकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं जावं, अशी मागणी करण्यात येत आहे. अशातच काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सीडीएस, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि तिन्ही सैन्यदलाच्या प्रमुखांची बैठक पार पडली. या बैठकीतही पंतप्रधान मोदी यांनी सैन्य दलाला फ्री हॅन्ड दिला असल्याचं समोर येत आहे. आता पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून कोणती कारवाई करण्यात येते हे पुढील काळातच स्पष्ट होणार आहे.

follow us