Download App

पाकिस्तानात ‘दहशत’ , PM मोदींचे सैन्याला आदेश; अडीच तास बैठकीत नेमकं घडलं काय?

PM Modi On Pahalgam Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) आता केंद्र सरकार देखील पाकिस्तानावर सैन्य कारवाई

  • Written By: Last Updated:

PM Modi On Pahalgam Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) आता केंद्र सरकार देखील पाकिस्तानावर सैन्य कारवाई करण्याची तयारी करत आहे. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान निवासस्थानी एक उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) , राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल (Ajit Doval) आणि संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान (Anil Chauhan) आणि लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी (Upendra Dwivedi) आणि नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी (Dinesh K. Tripathi) उपस्थित होते.

या बैठकीत सरकारला लष्करावर पूर्ण विश्वास आहे. हल्ल्याची वेळ आणि पद्धत सैन्याने ठरवावी असं पंतप्रधान मोदी म्हणाले असल्याची माहिती वृत्तसंस्था पीटीआयने दिली आहे. तसेच दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी सरकारने भारतीय लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य दिले असल्याची देखील माहिती पीटीआयकडून देण्यात आली आहे. ही बैठक अडीच तास चालली अशी देखील माहिती समोर आली आहे.

सैन्याने वेळ आणि टार्गेट ठरवावे: पंतप्रधान मोदी

या बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले की, दहशतवादाला योग्य धडा शिकवणे हा आपला राष्ट्रीय संकल्प आहे. भारतीय लष्कराने हल्ल्याची पद्धत आणि वेळ ठरवावे यासाठी लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य आहे. असं पंतप्रधान मोदी या बैठकीत म्हणाले.

वेळ कमी आहे : पंतप्रधान मोदी

तर दुसरीकडे एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते की, आपल्याकडे मर्यादित वेळ आणि टार्गेट मोठे आहे. त्यामुळे लवकरच भारताकडून देखील प्रत्युत्तर म्हणून मोठी कारवाई करण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्या पाठीमागे पाकिस्तानचा हात असल्याची माहिती सरकारला मिळाल्याने भारत सरकार पाकिस्तानविरुद्ध भारत अ‍ॅक्शन मोडमध्ये आहे. भारत सरकारने पाकिस्तानावर मोठी कारवाई करत सिंधू जल करार रद्द केला आहे. तसेच सर्व पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश देखील दिले आहे.

लिलाव जिंकून शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार मिळवण्यात राज्य सरकारला यश

तर आता भारताकडून लवकरच सैन्य कारवाई होणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे सध्या दोन्ही देशांच्या सीमेवर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

follow us