Wagah Attari Border Block Impact : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान (Pahalgam Terror Attack) विरुद्ध कठोर निर्णय घेतले आहेत. कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) बैठकीनंतर परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विवेक मिस्त्री यांनी निर्णयांची माहिती दिली. यातील एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे वाघा आटारी बॉर्डरवरील चेकपोस्ट (Jammu Kashmir) बंद करण्याचा निर्णय. हा चेकपोस्ट दोन्ही देशांतील व्यापार, प्रवास आणि सांस्कृतिक आदानप्रदानाचा मुख्य मार्ग राहिला आहे. या निर्णयामुळे भारत आणि पाकिस्तानवर काय परिणाम होईल (India Pakistan) असा प्रश्न आता विचारला जात आहे. चला तर मग आज याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊ या..
भारत सरकारने घेतलेला हा निर्णय पाकिस्तानसाठी त्रासदायक ठरणार आहे. हा निर्णय म्हणजे मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक म्हटला तरी वावगे ठरणार नाही.
अटारी वाघा बॉर्डर भारत आणि पाकिस्तान दरम्यान सडक मार्गाने होणाऱ्या व्यापाराचे मुख्य केंद्र आहे. याआधी 2019 मध्ये भारताने पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा रद्द केला होता. व्यापारात कपात केल्यानंतर सुद्धा काही आवश्यक वस्तूंची आयात निर्यात या मार्गे होत होती. आता भारताने हा चेकपोस्ट सुद्धा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पाकिस्तानला भारताकडून मिळणारे टॉमेटो, साखर, चहा पावडर आणि अन्य वस्तू मिळणार नाहीत.
फोन केला, मदत मागितली अन् एकनाथ शिंदे थेट श्रीनगरात पोहोचले; पर्यटकांना मिळाला दिलासा
सन 2019 मध्ये भारताने पाकिस्तानबरोबरील सर्व व्यापारिक संबंध तोडून टाकले होते. त्यावेळी तिथे जीवनावश्यक औषधे आणि कच्च्या मालाची मोठी टंचाई निर्माण झाली होती. अटारी चेकपोस्ट बंद झाल्याने या समस्येची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता आहे.
पाकिस्तान भारताला ताजी फळे, सिमेंट, कातडी आणि मसाले यांसारख्या वस्तू निर्यात करतो. चेकपोस्ट बंद झाल्याने या वस्तू भारताला मिळणार नाहीत. याचा फटका पाकिस्तानलाच बसणार आहे. भारत या वस्तू कुठूनही उपलब्ध करू शकतो. परंतु पाकिस्तानी व्यापाऱ्यांचे यामुळे निश्चितच नुकसान होणार आहे.
अटारी वाघा बॉर्डरच्या माध्यमातून दोन्ही देशांतील नागरिक एकमेकांच्या देशात ये जा करत असतात. परंतु आता हा प्रवास देखील बंद होणार आहे. याबाबत सरकारकडून अजून पूर्णपणे स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. 2019 मध्ये समझोता आणि थार एक्सप्रेस बंद झाल्यानंतर अनेक लोक पर्यायी मार्गांचा वापर करत होते. चेकपोस्ट बंद झाल्याने ही समस्या आणखी वाढणार आहे.
पाकिस्तान सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. देशात गरिबी आणि बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. या देशात गृहयुद्धाची स्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानी राज्यकर्ते देश सांभाळण्यात अपयशी ठरले आहेत. नागरिकांचा रोष वाढू नये म्हणून भारताच्या खोड्या काढून लोकांचे लक्ष याकडे वळवण्याचे उद्योग पाकिस्तानी सैन्य आणि सरकारमधील मंडळी करत आहेत. यातच आता भारताबरोबरील उरलासुरला व्यापारही बंद होणार असल्याने अर्थव्यवस्थेवरील ताण वाढणार आहे. तसा तर दोन्ही देशांतील व्यापार 2019 पासूनच बंद आहे.
पाकिस्तानला घाम फोडणारी CCS नक्की काय? एकाच बैठकीने शेजारी देशात खळबळ!
अटारी वाघा बॉर्डरवर दोन्ही देशांतील लोकांना रोजगार उपलब्ध होतो. परंतु आता येथील चेकपोस्ट बंद होणार असल्याने हे लोक बेरोजगार होणार आहेत. यामुळे सुद्धा पाकिस्तानात महागाई वाढण्याची दाट शक्यता आहे.