Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणाव सुरु आहे. भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. (Attack) त्यामुळे घाबरलेल्या पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रासंघाकडे धाव घेतली आहे. पाकिस्तान राजदुताची सुरक्षा परिषदेत बंद दाराआड बैठक झाली. या बैठकीत दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी संभाव्य प्रयत्नांवर चर्चा झाली.
पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारताकडून लष्करी कारवाई होणार आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्ताननेच घाईघाईने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेची बैठक बोलावण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर सुरक्षा परिषदेची बैठक बोलावून भारताला संयम बाळगण्याचं सांगितलं. परंतु, ही बैठक सभागृहात नाही तर चेंबरमध्ये झाली.
पाकिस्तानचे राजदूत असीम इफ्तिखार यांनी बैठकीनंतर सांगितलं की, सुरक्षा परिषदेच्या सदस्यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांनुसार आणि काश्मिरी लोकांच्या इच्छेनुसार जम्मू आणि काश्मीर वादासह सर्व मुद्दे शांततापूर्ण मार्गाने सोडवण्याची गरज ओळखली. प्रादेशिक स्थिरता एकतर्फी राखता येत नाही, हे देखील स्पष्टपणे मान्य करण्यात आलं. तसंच, आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन आवश्यक आहे, असं ठरल्याचं इफ्तिखार यांनी सांगितलं.
पाकिस्तानच्या लष्करप्रमुखाकडून पंतप्रधानांचं खेळणं; शाहबाज शरीफ पदावरून पायऊतार होणार?
पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारताकडून लष्करी कारवाई होणार आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्ताननेच घाईघाईने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेची बैठक बोलावण्याचे आवाहन केलं होतं. त्यानंतर सुरक्षा परिषदेची बैठक बोलावून भारताला संयम बाळगण्याचं सांगितलं. परंतु, ही बैठक सभागृहात नाही तर चेंबरमध्ये झाली.
पाकिस्तानचे राजदूत असीम इफ्तिखार यांनी बैठकीनंतर सांगितलं की, सुरक्षा परिषदेच्या सदस्यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांनुसार आणि काश्मिरी लोकांच्या इच्छेनुसार जम्मू आणि काश्मीर वादासह सर्व मुद्दे शांततापूर्ण मार्गाने सोडवण्याची गरज ओळखली. प्रादेशिक स्थिरता एकतर्फी राखता येत नाही, हे देखील स्पष्टपणे मान्य करण्यात आलं. तसंच, आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन आवश्यक आहे, असं ठरल्याचं इफ्तिखार यांनी सांगितलं.