पाकिस्तानच्या लष्करप्रमुखाकडून पंतप्रधानांचं खेळणं; शाहबाज शरीफ पदावरून पायऊतार होणार?
पाकच्या नार्कोटिक्स कंट्रोल विभागावार मुनीरचीच खास माणसं आहेत. असीम मुनीर पाकिस्तानच्या कारगील युद्धातल्या पराभवाचा

Pahalgam Terror Attack : पाकिस्तानचं नाक दाबण्यासाठी भारतानं सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर आता आणखी एक पाऊल उचललं आहे. जम्मू काश्मीरमधल्या चिनाब नदीवरच्या बगलिहार धरणाचे दरवाजे भारताने बंद केले. (Attack) त्यामुळे पाकिस्तानकडे जाणाऱ्या चिनाब नदीची पाणीपातळी कमालीची खाली गेली आहे. शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी पाकिस्तानच्या पंजाबचा मोठा भाग चिनाबवर अवलंबून आहे. याचदरम्यान आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफची खुर्चीच धोक्याच असल्याचं चित्र आहे.
सध्या भारतानं पाकिस्तानची चांगलीच कोंडी केली आहे. मात्र, दुसरीकडं पाकिस्तानात एक वेगळच चित्र आहे. कारण पाकिस्तानचा लष्करप्रमुख असीम मुनीर परवेझ मुशर्रफच्या पावलावर पाऊल टाकताना दिसतोय. आणि त्यामुळे पंतप्रधान शाहबाज शरीफची खुर्चीच धोक्यात येण्याची चिन्हं आहेत. हा असीम मुनीर परवेझ नेमका कोण आहे?, याची चर्चा सध्या रंगली आहे. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर माजी लष्कर प्रमुख परवेझ मुशर्रफ यांचाच कित्ता गिरवत असल्याचं सध्या दिसून येतंय. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे.
Video : पहलगामच्या चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या दहशतवाद्याची आत्महत्या; व्हिडिओ होतोय व्हायरल
पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीर मात्र पाकमध्ये चिथावणीखोर वक्तव्य करताना दिसतोय. मुनीरचे हे सगळे कारनामे पाहता तो मुशर्रफ पार्ट टूची तयारी करतोय, असं बोललं जातंय. नोव्हेंबर २०२२ मध्ये असीम मुनीरकडे पाकिस्तानच्या लष्कराची कमान सोपवण्यात आली. तीही मुनीरच्या निवृत्तीच्या दोन महिने आधी. पाकिस्तानातील अनेकांसाठी हा खरं तर धक्का होता. पण माजी पंतप्रधान इमरान खान यांच्याशी असलेल्या राजकीय वैमनस्यातून शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानी सेनेची सूत्रं मुनीरकडं दिली. पण हाच मुनीर आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज यांच्यासाठी धोक्याची घंटा बनला आहे.
पाकच्या नार्कोटिक्स कंट्रोल विभागावार मुनीरचीच खास माणसं आहेत. असीम मुनीर पाकिस्तानच्या कारगील युद्धातल्या पराभवाचा साक्षीदार आहे. त्यानं मुशर्रफ यांच्याप्रमाणेच सियाचीन प्रांतातील सीमेवर तो तैनात होता. पण पाक सेनेतल्या महत्वाच्या पदावर असलेल्या मुनीरनं आता पाकिस्तानातील तमाम सरकारी कंपन्यांवरही आपलं वर्चस्व गाजवायला सुरुवात केली आणि तो आता कधीही पाकिस्तानात अंतर्गत बंडाचं निशाण रोवू शकतो. त्यामुळे लवकरच पाकिस्तानात सत्तापालटही होण्याची चिन्ह आहेत.