Download App

नवविवाहित लेफ्टनंट नरवाल यांच्या हनीमून यात्रेचा दर्दनाक अंत, प्लॅन होता यूरोपचा पण…

नवविवाहित लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या हनीमून यात्रेचा दर्दनाक अंत पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात झालायं.

Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे लेफ्टनंट विनय नरवाल (Pahalgam Terror Attack) शहीद झाले. 16 एप्रिल रोजी त्यांचा विवाह झाला होता. विवाहानंतर ते पत्नी हिमांशी यांच्यासोबत हनीमूनसाठी जम्मू काश्मीरच्या पहलगामला गेले होते. हनीमूनसाठी त्यांना युरोपला जायचे होते, पण नरवाल यांच्या हनीमून यात्रेचा दर्दनाक अंत पहलगाममध्ये झालायं.

Pahalgam Terror Attack : हाफिज सईदशी कनेक्शन अन् आधुनिक शस्त्रांचा शौकीन; मास्टरमाईंड नेमका कोण?

विनय नरवाल हे कोच्चीमध्ये भारतीय नौदल सेनेत होते. दोन वर्षांपूर्वीच ते भारतीय नौदलात सामिल झाले. पहलगामला ते हनीमून यात्रेसाठी गेले होते. याच ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात त्यांची पत्नी हिमांशी सुरक्षित वाचल्या आहेत. हिमांशी यांच्या हाताच्या मेहंदीचा रंग उडण्याआधीच त्यांचं सौभाग्य हरवलंय. या घटनेमुळे नरवाल परिवारावर मोठा घात झालायं.

Horoscope Today : आजचे राशी भविष्य, या राशींसाठी मंगळवार खूप महत्वाचा आहे, दिवस कसा जाईल ते जाणून घ्या

लेफ्टनंट विनय नरवाला यांना हनीमून यात्रेसाठी स्विझरलॅंडला जायचे होते, मात्र पासपोर्ट न मिळाल्याने त्यांनी काश्मीरला जाण्याचं ठरवलं. विनय नरवाला यांचा हा निर्णय शेवटचा ठरला. पहलगाम दहशतवादी हल्लेखोरांना सोडणार नसल्याचा इशारा मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी दिला आहे. काल नरवाल यांच्या आजोबांशी व्हिडिओ कॉलवरुन सैनी यांनी संवाद साधला. हल्लेखोरांवर कडक कारवाई करुन दहशतवाद मुळापासून उखडून टाका, अशी मागणी त्यांनी यावेळी केलीयं.

मुंबई शहरातील जमिनींवर होणाऱ्या लँड स्कॅमचा बादशाह.. आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर थेट वार

भारतीय नौदलकडूनही विनय नरवाल यांच्या मुत्यूवर शोक व्यक्त करण्यात आला आहे. नौदलाचे प्रमुख दिनेश त्रिपाठी यांनी ट्विट करत शोक व्यक्त केलायं. नरवाल यांच्या मृत्यूनंतर नौदल दुखी असून या दुखद घटनेनंतर आम्ही सर्वच नरवाल परिवारासाठी संवेदना व्यक्त करत आहोत.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पहेलगामच्या दहशतवादी हल्ल्याचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर समोर आले आहेत. यामध्येच एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक महिला एक थरारक घटनाक्रम सांगत आहे. ती महिला सांगत आहे की, दहशतवादी तिच्या पतीवर गोळीबार करत त्याला ठार केले. हा हल्ला करण्याच्या अगोदर हे दाम्पत्य भेलपुरी खात होतं. त्यावेळी या दहशतवाद्यांनी त्यांना त्यांचा धर्म विचारला. तुम्ही मुस्लिम आहात का? असं विचारल्यानंतर यांनी आपला धर्म सांगितला आणि त्यानंतर त्यांनी आपल्या पतीला मारल्याचं ही महिला सांगत आहे.

follow us