Download App

Pahalgam Terror Attack : होय, चूक झाली; सर्वपक्षीय बैठकीत मोदी सरकारने मान्य केल्या सुरक्षेतील त्रुटी

Pahalgam Terror Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ल्यानंतर आज केंद्र

  • Written By: Last Updated:

Pahalgam Terror Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ल्यानंतर आज केंद्र सरकारकडून सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सरकारने पहलगाममध्ये सुरक्षेतील त्रुटी मान्य केल्या आहे. रक्षामंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांच्या अध्यक्षेखाली झालेल्या या बैठकीत गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासह विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) देखील उपस्थित होते.

दोन तास चाललेल्या या बैठकीत सरकारने पहलगाममध्ये सुरक्षेतील त्रुटी मान्य केल्या. या बैठकीत विरोधी पक्षांकडून सुरक्षेतील झालेल्या त्रुटीबाबात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. ज्या बैसरन खोऱ्यात ही घटना घडली तिथे सुरक्षा कर्मचारी का नव्हते असा प्रश्नही राहुल गांधी यांनी विचारला.

यावर उत्तर देत सरकारने सांगितले की, साधारणपणे जूनमध्ये अमरनाथ यात्रा सुरू झाल्यावर हा मार्ग उघडला जातो, कारण अमरनाथ यात्रेचे यात्रेकरू या ठिकाणी विश्रांती घेतात, परंतु यावेळी स्थानिक टूर ऑपरेटर्सनी सरकारला न कळवता तिथे पर्यटकांचे बुकिंग घेण्यास सुरुवात केली आणि 20 एप्रिलपासून पर्यटकांना तिथे घेऊन जाण्यास सुरुवात केली, ज्याची स्थानिक प्रशासनाला माहिती नव्हती. यामुळे, दरवर्षी जून महिन्यात अमरनाथ यात्रा सुरू होण्यापूर्वी या ठिकाणी तैनात केले जात असल्याने तेथे सुरक्षा व्यवस्था करण्यात आली नव्हती.

तर दुसरीकडे सिंधू पाणी करार तात्पुरता स्थगित करण्याच्या मुद्द्यावर एआयएमआयएमचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) म्हणाले की, आमच्याकडे पाणी साठवण्याची किंवा थांबवण्याची कोणतीही व्यवस्था नाही. मग ते पुढे ढकलून ठेवण्याचा काय फायदा? यावर सरकारने उत्तर दिले की, सरकारचा हेतू व्यक्त करण्यासाठी आणि मेसेज देण्यासाठी आणि भविष्यात भारत सरकारची भूमिका काय असेल हे सांगण्यासाठी हे केले गेले आहे.

आम्ही सरकारसोबत, सर्वपक्षीय बैठकीत राहुल गांधींचा सरकारला बिनशर्त पाठिंबा 

या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) म्हणाले की, सरकारने सर्व पक्षांच्या नेत्यांना दहशतवादाविरुद्ध कारवाईचे आश्वासन दिले आहे. आयबी आणि गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी या चुकीबद्दल माहिती दिली. अशा घटनांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी पावले उचलली जात आहेत. सर्वपक्षीय बैठकीत सर्व पक्षांनी सांगितले की ते सरकारसोबत आहेत आणि दहशतवादाच्या विरोधात आहेत. अशी माहिती केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

follow us