Pahalgam Terror Attack : हल्ल्यानंतर राहुल गांधी उद्या अनंतनागमध्ये; जखमींची भेट घेणार…

Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी (Pahalgam Terror Attack) हल्ला करत 28 जणांचा जीव घेतला. दहशतवादी हल्ला होताच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी श्रीनगरमध्ये दाखल होत जखमी नागरिकांसह मृत कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर आता काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनीही आपल्या अनंतनाग दौऱ्याची घोषणा केलीयं. पहलगाम हल्ल्यातील जखमी नागरिकांची राहुल गांधी भेट घेणार आहेत.
कधी विमानात बसले नाहीत, त्यांना विमानात परत आणलं; शिंदेंच्या खासदाराचं वादग्रस्त विधान
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर राहुल गांधी काँग्रेसच्या कार्यसमितीच्या बैठकीला हजर राहण्यासाठी अमेरिकेचा दौरा सोडत भारतात परतले आहेत. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आलीयं. संसद भवनात झालेल्या या बैठकीला राहुल गांधी यांनी हजेरी लावलीयं. या बैठकीनंतर राहुल गांधी पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या कारवाईमध्ये सामिल होणार आहेत.
कृष्णा आंधळे अजूनही फरार… दोन अधिकाऱ्यांची SIT मध्ये नियुक्ती, धनंजय देशमुख यांची माहिती
पहलगाम येथे झालेल्या दहशतवाही हल्ल्यानंतर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. या बैठकीत लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दहशतवादाविरुद्धच्या प्रत्येक पावलावर सरकारसोबत आहे असं म्हटलं आहे. या बैठकीनंतर राहुल गांधी म्हणाले की, सर्वपक्षीय बैठकीत सर्वांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. विरोधी पक्षाने सरकारला कोणतीही कारवाई करण्यासाठी पूर्ण पाठिंबा दिला आहे. असं राहुल गांधी म्हणाले.
दरम्यान, जम्मू काश्मीरमील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे भारतामध्ये संतापाची लाट आहे. मंगळवारी दहशतवाद्याने २6 पर्यटकांचा जीव घेतला. नाव विचारले, आयडी पाहिले अन् धडाधड गोळ्या झाडल्या. पोलिसांच्या वेशात आलेल्या या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुण्यातील दोघांचा समावेश आहे.