Lashkar-e-Taiba commander Altaf Lalli killed : पहलगाम हल्लानंतर जम्मू काश्मीरमध्ये वातावरण तापलं आहे. अशातच, आज सकाळपासून जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा येथे चकमक सुरू आहे. बांदीपोरा जिल्ह्यात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या भागात घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली होती. (commander) यामध्ये दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. त्यानंतर मोठी चकमक झाली. या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा एक प्रमुख दहशतवादी ठार झाला आहे. सुरक्षा दलांनी लष्करचा दहशतवादी अल्ताफ लाली याला ठार मारलं आहे.
सकाळपासून बांदीपोरा येथे चकमक सुरू आहे. बांदीपोरा जिल्ह्यात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या भागात घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली होती. लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केल्यानंतर शोध मोहीम चकमकीत रूपांतरित झाली, असं त्यांनी सांगितलं.
पहलगाम हल्ल्यानंतर BCCI संतप्त, पाकिस्तान विरुद्ध थेट ICC लाच धाडलं पत्र; कारण काय?
या चकमकीत एक दहशतवादी जखमी झाल्याचं वृत्त आधी आले होतं. यादरम्यान, दोन सुरक्षा कर्मचारीही जखमी झाले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेली ही चौथी चकमक आहे. काल गुरुवार याआधी सुरक्षा दलांनी उधमपूरच्या दुडू बसंतगडमध्ये काही दहशतवाद्यांना घेरले होते. या चकमकीत लष्कराचा एक हवालदार शहीद झाला आहे. दरम्यान, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आज श्रीनगरमध्ये दाखल झाले. त्यांना बांदीपोरा येथे सुरू असलेल्या सर्च ऑपरेशनची माहिती देण्यात आली. ते येथील सुरक्षा स्थितीचा आढावा घेत आहेत.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सीमेवर तणावाची परिस्थिती आहे. पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवसांनंतर पाकिस्तानी सैन्याने रात्रभर नियंत्रण रेषेवरील (LoC) अनेक पाकिस्तानी चौक्यांवरून गोळीबार केला. पण या गोळीबाराला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले. या घटनेत भारताच्या बाजूने कोणीही जखमी अथवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
BREAKING NEWS 🚨 📢
Top Lashkar e Taiba Commander Altaf Lalli eliminated by security forces in Bandipora.
— News Arena India (@NewsArenaIndia) April 25, 2025