पहलगाम हल्ल्यानंतर BCCI संतप्त, पाकिस्तान विरुद्ध थेट ICC लाच धाडलं पत्र; कारण काय?

India Pakistan Cricket Tension : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव (India Pakistan Tension) वाढला आहे. भारत सरकारने पाकिस्तानला हादरवणारे निर्णय (Pahalgam Terror Attack) घेतले आहेत. यानंतर आता बीसीसीआयनेही पाकिस्तान विरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे. रिपोर्ट्सनुसार बीसीसीआयने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) एक पत्र लिहिले आहे. आम्ही पाकिस्तानबरोबर क्रिकेट सामने खेळू इच्छित नाही असे या पत्रात म्हटले आहे.
याआधी पाकिस्तानात झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत (Champions Trophy 2025) भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला होता. या सामन्यात टीम इंडियाने (Team India) पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला होता. क्रिकबजच्या रिपोर्टनुसार बीसीसीआयने आयसीसीला पत्र लिहून एक विनंती केली आहे. आगामी काळातील आयसीसी टूर्नामेंटमध्ये भारत आणि पाकिस्तान संघाला एकाच ग्रुपमध्ये ठेवले जाऊ नये. एकूणच बीसीसीआयने किमान आयसीसी इव्हेंटच्या साखळी फेरीतील ग्रुपमध्ये पाकिस्तानबरोबर सामने होऊ नयेत अशी इच्छा व्यक्त केली आहे.
आम्हाला वेगळं करू नका न्याय हवा.. पहलगाम हल्ल्यानंतर अभिनेत्री हिना खानची पोस्ट
दोन्ही संघ आयसीसी महिला वनडे वर्ल्डकपमध्ये मात्र भाग घेत राहतील. या स्पर्धेत आठ संघांनी क्वालिफाय केलं आहे. प्रत्येक संघाला राउंड रॉबिन फॉर्मेटमध्ये सर्व संघांविरुद्ध सामने खेळावे लागणार आहेत. आयसीसी, पीसीबी आणि बीसीसीआय यांच्यातील एका जुन्या करारानुसार पाकिस्तान भारतात कोणताही सामना खेळणार नाही. महिला वर्ल्डकप यावर्षात 26 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर या काळात भारतात होणार आहे. पाकिस्तानचा संघ भारतात येणार नाही म्हटल्यानंतर बीसीसीआयला तटस्थ ठिकाणाची निवड करावी लागणार आहे. परंतु, याबाबत अद्याप काहीच निर्णय झालेला नाही.
आशिया कपवर काय निर्णय होणार
दुसरीकडे पुरुष आयसीसी टूर्नामेंट 2026 मध्ये होणार आहे. भारत आणि श्रीलंका फेब्रुवारी मार्च दरम्यान टी 20 वर्ल्डकपचे आयोजित करणार आहेत. आता या स्पर्धेवर बीसीसीआयच्या पत्राचं सावट आहे. क्रिकबजने याआधीच आपल्या रिपोर्टमध्ये सांगितलं होतं की ही स्पर्धा न्यूट्रल ठिकाणी आयोजित केली जाईल. याआधी बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनीही बोर्ड भारत सरकारच्या निर्णयाचं पालन करेल असे सांगितले होते.
पाकिस्तान संघ विश्वचषकासाठी पात्र अन् बीसीसीआयचं वाढणार टेन्शन; जाणून घ्या कारण