Lawrence Bishnoi : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terrorist Attack) संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली असून दहशतवादी हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे या हल्लात पाकिस्तानचा (Pakistan) हात असल्याची माहिती भारत सरकारला मिळाली आहे. यामुळे भारत सरकार देखील पाकिस्तानवर लष्करी कारवाई करण्याची तयारी करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी भारतीय लष्कराला फ्री हँड दिला असल्याने पाकिस्तानवर कारवाई होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
तर दुसरीकडे आता पाकिस्तानात प्रवेश करुन एका व्यक्तीला मारु ज्याची किंमत लाखा बरोबर असेल अशी धमकी लॉरेन्स बिश्नोई गँगने दिली असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट देखील व्हायरल होत आहे. तसेच व्हायरल पोस्टमध्ये लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईदचा फोटो आहे. ज्याच्यावर क्रॉसचे चिन्ह दाखवण्यात आले आहे. मात्र व्हायरल होत असलेली पोस्ट लॉरेन्स बिश्नोई गगँकडून करण्यात आली आहे का? याबाबत सध्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही मात्र ही पोस्ट बिश्नोई गगँची असल्याचा दावा करण्यात येत आहे.
सुपरस्टार सलमान खानला अनेकदा लॉरेन्स बिश्नोई गगँकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. 2022 मध्ये पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाची भरदिवसा हत्या, राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दीकीची हत्या आणि सलमान खानच्या घरावर हल्ला या काही प्रमुख घटनांमुळे बिश्नोई गगँ सोशल मीडियावर चर्चेत आहे.
पाकिस्तानी डॉनशी संबंध
माहितीनुसार लॉरेन्स बिश्नोई गगँचे पाकिस्तानी डॉनशी संबंध आहे. याबाबत अनेकदा पोलिसांनी पुरावे देखील दिले आहे. गेल्या वर्षी लॉरेन्स बिश्नोईचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये लॉरेन्स बिश्नोई पाकिस्तानी डॉन शहजाद भट्टीला ईदच्या शुभेच्छा देत होता. तर दुसरीकडे पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येत पाकिस्तानातून आयात केलेल्या एके-47 रायफलव्यतिरिक्त 30 बोर आणि 9 एमएम पिस्तूलचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले आहे.
22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याची माहिती भारत सरकारला मिळाली आहे. यानंतर भारत सरकारकडून पाकिस्तानावर कठोर कारवाई करण्यात येत आहे.
PM Modi : काहीतरी मोठं घडणार? पंतप्रधान मोदींचा रशिया दौरा रद्द
भारतात राहणाऱ्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहे. तर दुसरीकडे 1960 पासून सुरु असणारा सिंधू जल करार देखील भारताने रद्द केला आहे.