Download App

दहशतवादाचे मूळ पाकिस्तान अन् ही काँग्रेसची चूक, अमित शहांचा हल्लाबोल

Amit Shah On Operation Sindoor : दहशतवादाचे मूळ पाकिस्तान आहे आणि ही काँग्रेसची चूक असल्याची टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी

  • Written By: Last Updated:

Amit Shah On Operation Sindoor : दहशतवादाचे मूळ पाकिस्तान आहे आणि ही काँग्रेसची चूक असल्याची टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ऑपरेशन सिंदूरवर (Operation Sindoor) लोकसभेत सुरु असणाऱ्या चर्चेदरम्यान काँग्रेसवर केली आहे. लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरु असून आज या चर्चेच्या दुसऱ्या दिवशी गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी या चर्चेत सहभाग घेत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

विरोधकांना दहशतवादावर बोलण्याचा अधिकार नाही. दहशतवादाचे मुळ पाकिस्तान आहे आणि ही काँग्रेसची चूक आहे. असं लोकसभेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.

1948 मध्ये नेहरूंनी एकतर्फी युद्धबंदीची घोषणा  

पुढे बोलताना अमित शाह म्हणाले की, विरोधी पक्ष विचारत आहे की आपण युद्ध का केले नाही, परंतु युद्धाचे अनेक परिणाम होतात आणि हे समजून घेण्यासाठी मी तुम्हाला काही ऐतिहासिक संदर्भ सांगतो, 1948 मध्ये काश्मीरमध्ये आपले सैन्य मजबूत होते आणि सरदार पटेल देखील सतत आग्रह धरत होते की आपण पुढे जाऊ, परंतु जवाहरलाल नेहरुंनी एकतर्फी युद्धबंदीची घोषणा केली.

मी जबाबदारीने सांगतो पाकव्याप्त काश्मीर हा नेहरुंचा वारसा आहे. तर सिंधू पाणी करारातही नेहरूंनी भारताच्या नदीचा 80 टक्के पाणि पाकिस्ताना वाटप केला अशी टीका देखील अमित शाह यांनी काँग्रेसवर केली.

पार्टीत ड्रग्ज आढलेले नाही, रेव्ह पार्टीची व्याख्या काय? अब्रुनुकसानीचा दावा करणार; एकनाथ खडसे 

पीओके मागण्यास विसरले : अमित शाह

तर 1971  मध्ये संपूर्ण देशाने इंदिराजींना पाठींबा दिला होता. त्यांनी तेव्हा पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते आणि हा भारतासाठी मोठा विजय होता. याचा भारताला अभिमान आहे, आम्हाला देखील अभिमान आहे. त्यावेळी 93 हजार युद्धकैदी आणि 15 हजार चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आमच्या ताब्यात होते पण जेव्हा शिमला करार झाला तेव्हा भारत पीओके मागण्यास विरसले आणि भारताने जिंकलेली 15 हजार चौरस किलोमीटर जमीन परत केली अंस देखील यावेळी अमित शाह म्हणाले.

follow us