पार्टीत ड्रग्ज आढलेले नाही, रेव्ह पार्टीची व्याख्या काय? अब्रुनुकसानीचा दावा करणार; एकनाथ खडसे

पार्टीत ड्रग्ज आढलेले नाही, रेव्ह पार्टीची व्याख्या काय? अब्रुनुकसानीचा दावा करणार; एकनाथ खडसे

Eknath Khadse On Pune Rave Party Case : राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCPSP) जेष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात (Pune Rave Party Case) पोलिसांच्या भूमिकेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पोलिसांनी आमच्या कुटुंबियाचे व्हिडिओ, फोटो का व्हायरल केले, व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याचा अधिकार पोलिसांना कुणी दिला असा जाब एकनाथ खडसे यांनी पोलीस प्रशासनाला विचारला आहे. या प्रकरणात आज खडसे आज पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. या वेळी बोलताना पोलिसांवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असं देखील खडसे म्हणाले.

पत्रकार परिषदेमध्ये बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, माझ्या जवायाने आयुष्यात कधीही ड्रग्ज घेतले नाही. त्या पार्टीत ड्रग्ज आढलेले नाही, या पार्टीला रेव्ह पार्टी म्हणायचं का? पोलिसांनी रेव्ह पार्टीची व्याख्या सांगावी. ड्रग्ज सेवन केले होते की नाही याचा अहवाल अद्याप आलेला नाही, अहवाल आल्यानंतर समजेल माझे जावई प्रांजल खेवलकर यांनी ड्रग्ज घेतले होते की नाही? असं पत्रकार परिषदेमध्ये बोलताना एकनाथ खडसे म्हणाले.

पुढे बोलताना पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ खडसे म्हणाले की, पोलिसांनी आमच्या कुटुंबियांचे फोटो व्हायरल केले पण त्यांना हा अधिकार कोणी दिला, प्रांजल खेवलकर यांच्यावर एक क्रमांकाचा गुन्हा का दाखल केला, माध्यमामध्ये वैद्यकीय अहवाल कसा समोर आला असे प्रश्न देखील एकनाथ खडसे यांनी या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना उपस्थित केले. तसेच या पार्टीत संगीत नाही, आदळआपट नाही, डान्स नाही, घरात सात जण बसलेले होते याला रेव्ह पार्टी म्हणाता येणार का? पोलिसांनी ज्या ज्या ठिकाणी कारवाई केली त्याचे व्हिडिओ त्यांनी व्हायरल केले, निव्वळ बदनामी करण्याचा प्रयत्न आहे असा दावा देखील खडसे यांनी केला.

नांदणी ग्रामस्थ भावूक, न्यायालयाच्या आदेशानंतर महादेवी हत्तीणी वनताराकडे रवाना

तसेच अलीकडे सरकार विरोधात रोहिणी खडसे बोलत आहेत त्यामुळे असं बदनाम केलं जात आहे. जे काही सत्य समोर येईल. असेही एकनाथ खडसे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube