Download App

Chandrayaan-3 च्या यशाबद्दल जगभरातून कौतुकाचा वर्षाव, पाकिस्ताननेही केलंही भारताचं अभिनंदन

Chandrayaan-3 भारतीय अंतराळ संस्था ISRO च्या शास्त्रज्ञांनी आजपर्यंत जगातील कोणताही देश करू शकला नाही ते करून दाखवले आहे. चंद्राच्या सर्वात कठीण दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 चे (Chandrayaan-3) लँडिंग करण्यात इस्त्रोला (ISRO) यश आले आहे. या कामगिरीनंतर जगभरातून भारतावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी चांद्रयान-3 मोहिमेच्या यशाबद्दल इस्रोसह देशातील 140 कोटी जनतेचे अभिनंदन केले आहे.

पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांनी केलं खास कौतुक
पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरी यांनी भारताच्या यशाबद्दल अभिनंदन केले आहे. चंद्रावर चांद्रयान 3 चे लँडिंग हा ISRO साठी खूप मोठा क्षण आहे. इस्रोचे अध्यक्ष सोमनाथ यांच्यासह अनेक तरुण वैज्ञानिक हा क्षण साजरा करताना मी पाहतो आहे. स्वप्ने असलेली तरुण पिढीच जग बदलू शकते… शुभेच्छा.

युरोपियन स्पेस एजन्सीने काय म्हटले?
युरोपियन स्पेस एजन्सीने भारताच्या यशावर लिहिले की चांद्रयान टीम आणि इस्रोचे खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. अंतराळ संस्थेने हात जोडून इमोजी शेअर करून भारताच्या यशाला सलाम केला आहे. दुसरीकडे, युरोपियन स्पेस एजन्सीचे महासंचालक जोसेफ एशर म्हणाले की, क्रेडिबल, इस्रो, चांद्रयान-3 आणि भारतातील लोकांचे खूप खूप अभिनंदन.

Pune Crime : फिल्मी स्टाईलने गोळ्या झाडून तरुणाची हत्या, पिंपरी-चिंचवडमधील घटना..

इस्रायलनेही केलं अभिनंदन
इस्रायलचे राजदूत नाओर गिलन म्हणाले की, इस्रो आणि भारताचे हार्दिक अभिनंदन. चांद्रयान-3 ची ही उपलब्धी देखील अतुलनीय आहे कारण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अजून कोणताही देश पोहोचू शकला नाही. तुमचे हे यश आम्हा सर्वांना चंद्राविषयी अधिक सखोल जाणून घेण्याची प्रेरणा देईल.

ब्रिटीश उच्चायुक्ताने हिंदीमधून अभिनंदन केलं
भारतातील ब्रिटीश उच्चायुक्त अॅलेक्स एलिस यांनी हिंदीत अभिनंदन लिहून भारताचा गौरव केला आहे. त्यांनी लिहिले की, हा केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी मोठा क्षण आहे.

Chandrayaan-3 ; दक्षिण ध्रुवावर लँडिंग, विक्रम आणि प्रज्ञान देणार सूर्यमालेची माहिती

नासाने व्यक्त केला आनंद
नासाचे बिल नेल्सन यांनी लिहिले की, चांद्रयान-3 दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केल्याबद्दल इस्रोचे अभिनंदन! आणि चंद्रावर अंतराळयान यशस्वीपणे सॉफ्ट-लँड करणारा चौथा देश बनल्याबद्दल भारताचे अभिनंदन. या मिशनमध्ये तुमचा भागीदार असल्याचा आम्हाला आनंद आहे!

नेपाळच्या परराष्ट्रमंत्र्यांकडून शुभेच्छा
नेपाळचे परराष्ट्र मंत्री एनपी सौद यांनी लिहिले की चंद्रावर चांद्रयान-3 च्या यशस्वी सॉफ्ट-लँडिंगबद्दल भारताचे हार्दिक अभिनंदन! आपल्या भारतीय मित्रांसाठी हा केवळ राष्ट्रीय अभिमानाचा क्षण नाही तर अवकाश विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. जे शेवटी आपले जीवन सुधारण्यास हातभार लावेल.

Chandrayan 3 : ‘आम्ही या क्षणाची खूप दिवसांपासून वाट पाहतोय’, यशस्वी लॅंडिंगनंतर के सिवान यांची यांची प्रतिक्रिया

ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सीकडून खास शुभेच्छा
ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सीचे प्रमुख एनरिको पालेर्मो यांनी लिहिले की इतिहास घडला आहे. इस्रोने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केले आहे. त्यांनी इस्रोच्या टीमचेही अभिनंदन केले आहे.

मालदीवच्या परराष्ट्रमंत्र्यांकडून शुभेच्छा
मालदीवचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला शाहिद यांनी लिहिले की, भारताने रचला इतिहास! दक्षिण आशियाई राष्ट्र आणि शेजारी म्हणून, चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ Chandrayaan 3 चे यशस्वी लँडिंग केल्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. हे सर्व मानवतेचे यश आहे! नवीन क्षेत्रांसाठी नवीन मार्ग खुले होत आहेत. अभिनंदन भारत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचे अभिनंदन आणि शास्त्रज्ञांचा अभिमान आहे.

Tags

follow us