When Trains Hijacked In India : पाकिस्तानमध्ये (Pakistan) एक धक्कादायक घटना घडली आहे. तिथे दहशतवाद्यांनी संपूर्ण ट्रेनच हायजॅक केलीय. बोलनमध्ये बलुच लिबरेशन आर्मीने जाफर एक्सप्रेस ट्रेनचं अपहरण (Trains Hijacked) केलंय. त्यांनी 100 हून अधिक लोकांना ओलीस ठेवल्याचा दावा केला जातोय. या ट्रेनमध्ये लष्कर आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचे अधिकारी देखील प्रवास करत होते, असं सांगितलं जातंय.
पाकिस्तानी लष्करानेही या प्रकरणामध्ये कारवाई सुरू केलीय. या घटनेत आतापर्यंत सहा सैनिकांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय. परंतु ट्रेन हायजॅक होण्याची ही काही पहिलीच घटना नाहीये. याअगोदर पाकिस्तानसारखी घटना भारतात (Trains Hijacked In India) देखील घडली आहे. येथेही अनेक वेळा रेल्वेचं अपहरण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटना नेमक्या केव्हा घडल्या होत्या, त्यासंदर्भात आपण सविस्तर जाणून घेऊ या.
विराट कोहली एकाच धावेवर बाद, 14 वर्षीला मुलीला धक्का बसला… हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
2013 मधील रेल्वे अपहरण प्रकरण
भारतात 2013 मध्ये रेल्वे अपहरणाची घटना घडली होती. 6 फेब्रुवारी रोजी, मुंबई-हावडा मुख्य रेल्वे मार्गावरील सिरसा गेट आणि कुम्हारी दरम्यान जन शताब्दी ट्रेनचे सुमारे 13 किलोमीटरपर्यंत अपहरण करण्यात आलं होतं. या प्रकरणात 6 दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. हे संपूर्ण प्रकरण जयचंद अपहरण प्रकरणाशी जोडलं गेलेलं आहे. 2001 मध्ये, व्यापारी जयचंद वैद्य यांचे अपहरण करण्यात आलं होतं. त्यांना 44 दिवस ओलीस ठेवण्यात आले. या घटनेत पोलिसांनी उपेंद्र सिंग उर्फ काबरा याला मुख्य आरोपी केलं होतं. मात्र, तो तुरुंग तोडून पळून गेला होता. नंतर त्याने जन शताब्दी अपहरणाची घटना घडवून आणल्याचं सांगितलं जातंय.
बंडखोर BLA समोर पाकिस्तानी सैन्याचं आत्मसमर्पण; ‘त्या’ 6000 लष्कराची संपूर्ण कुंडली, एका क्लिकवर…
2009 मध्येही झालं होतं ट्रेनचं अपहरण
याशिवाय 2009 मध्ये भारतात देखील अशीच एक ट्रेन अपहरणाची घटना घडली होती. 2009 मध्ये सशस्त्र माओवाद्यांनी भुवनेश्वर-राजधानी एक्सप्रेस ट्रेनचे अपहरण केलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, जंगलमहलमध्ये सुमारे 300 ते ४०० माओवाद्यांनी संपूर्ण ट्रेन हायजॅक केली होती. यावेळी शेकडो प्रवाशांना आणि अनेक रेल्वे कर्मचाऱ्यांनाही ओलीस ठेवण्यात आलं होतं. या अपहरणाच्या घटनेमागे छत्रधरचं नाव पुढे आलं होतं. ही घटना त्याच्या सूचनेनुसार घडली होती, असं सांगितलं जात होतं. त्यानंतर अथक प्रयत्नांनी 20 पोलीस आणि सुमारे 150 सीआरपीएफ जवानांनी अपहरणकर्त्यांच्या तावडीतून ट्रेनची सुटका केली होती. सुदैवाने, या घटनेत ट्रेन चालक आणि प्रवासी पूर्णपणे सुरक्षित होते.