Download App

कोलकाता डॉक्टर बलात्कार अन् हत्या प्रकरणात नवा ट्वीस्ट; पीडितेच्या पालकांचा पोलिसांवर गंभीर आरोप

कोलकाता आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालयातील पीडितेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची घाई केल्याचा आरोप पीडितेच्या पालकांनी केला.

  • Written By: Last Updated:

Kolkata Doctor Rape-Murder Case :  पश्चिम बंगालमधील कोलकाता आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालयातील पीडितेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची घाई करत कोलकता पोलिसांनी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप पीडितेच्या पालकांनी केला. पीडितेच्या न्यायासाठी आर.जी. कर महाविद्यालयातील स्थानिक डॉक्टर आंदेालन करत असून यात काल रात्री पीडितेचे पालकही सहभागी झाले.

मोठी बातमी ! मुंबईतील टाईम्स टॉवरला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु

लाच देण्याचा प्रयत्न

एवढेच नाही तर एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने आम्हाला लाच देण्याचा प्रयत्नही केला असा धक्कादायक खुलासाही त्यांनी यावेळी केला आहे. आर.जी. कर महाविद्यालय परिसरात महिनाभरापासून आंदोलन सुरू असून आर.जी कर महाविद्यालयातील काही डॉकटर अजूनही आंदोलन करत आहेत. या आंदोलनात काल पीडितेच्या पालकांनी सामील होत न्यायाची मागणी केली आहे.

मृतदेह मिळण्यासाठी आम्हाला पोलीस ठाण्यात वाट पाहावी लागली. तसंच, अंत्यसंस्कार करण्यासाठी घाई केली. यादरम्यान एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला पैशाचे आमिष दाखवलं. मात्र पैसे घेण्यास नकार दिला. पीडितेसाठी न्यायाची मागणी करणाऱ्या डॉक्टरांच्या आंदोलनात आम्ही सामील झाल्याचं पालकांनी सांगितलं आहे.

प्रदेशाध्यक्ष रिपून बोरांनी सोडली ममता बॅनर्जींची साथ, कॉंग्रेसमध्ये पक्ष प्रवेश करणार?

भाजपवर तृणमूलचे टीकास्र

पीडितेचे पालक म्हणाले, पोलिसांनी सुरुवातीपासूनच हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. आम्हाला मृतदेह पाहण्याची देखील परवानगी दिली नाही आणि आम्हाला मृतदेह दाखविण्यापूर्वीच तो विच्छेदनासाठी पाठवण्यात आला. निवासी डॉक्टरच्या प्रकरणाला भाजप आणि अन्य पक्षांकडून राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या वतीने करण्यात आला.

follow us