Doctor Rape Case: कोलकाता डॉक्टर बलात्कार अन् हत्येप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

Doctor Rape Case: कोलकाता डॉक्टर बलात्कार अन् हत्येप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

SC Hearing on Kolkata Doctor Case : कोलकाता येथील महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वत:हून दखल घेतली आहे. (Doctor Murder Case) सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठ आज या प्रकरणारवर सुनावणी करणार आहेत. दोन वकिलांनी सरन्यायाधीसांना पत्र पाठवून या प्रकरणाची स्वत:हून दखल घेण्याची विनंती केली होती.

ममता बॅनर्जी गुन्हेगारांच्या पाठीशी, सत्य दडवलं जातंय; कोलकाता हत्याप्रकरणावरून भाजपचा आरोप

एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचं प्रकरण चांगलंच तापलं आहे. काल तपास यंत्रणा सीबीआयने आरजी कार मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. संदीप घोष यांची १३ तासांहून अधिक काळ चौकशी केली. त्यांची आज पुन्हा चौकशी होऊ शकते. त्याचवेळी आरोपी संजय रॉयची आता पॉलीग्राफ चाचणी केली जाणार आहे. सीबीआयला कोर्टाची मंजुरी मिळाली आहे. आरोपी किती खोटे बोलत आहे आणि किती सत्य आहे हे पॉलीग्राफी चाचणीतून स्पष्ट होईल. तपास यंत्रणेने आरोपीची मानसिक चाचणी केली आहे. सीबीआयला माजी प्राचार्य डॉ. संदीप घोष यांचीही पॉलिग्राफी चाचणी करायची आहे.

Arjun Kapoor: कोलकातामधील संतापजनक घटनेवर अभिनेत्याने पुरूषांना दिला मोलाचा सल्ला; म्हणाला, स्त्रियांचे रक्षण

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्यायमूर्ती जेबी परडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर आज या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली आहे. त्याच वेळी, डॉक्टरांच्या विरोधामुळे पश्चिम बंगालमधील आरोग्य सेवा ठप्प झाली आहे. देशभरात डॉक्टरांच्या संघटना आंदोलन करत आहेत. बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस दिल्लीत पोहोचले आहेत. ते आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांचीही भेट घेऊ शकतात.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube