Video: ‘काश मैं भी लड़का होती’, अभिनेता आयुष्मान खुरानाची कोलकाता बलात्कार प्रकरणावर कविता
Kolkata Doctor Murder Case : कोलकातामध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. या हृदयस्पर्शी घटनेच्या विरोधात देशभरात संतापाची लाट आहे. (Kolkata Doctor) यावर आता सर्व स्तरातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. अशातच आता बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाने पीडितेवर एक कविता शेअर केली आहे.
Crime : प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून खून; राज्यामध्ये संतापाची लाट, विद्यार्थ्यांचं आंदोलन
अभिनेता अंशुमानने आपल्या या हृदयस्पर्षी कवितेतून बरच काही सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ‘काश मै भी लडका होती’ या शीर्षकाची ही कविता आहे. कोलकाता येथे डॉक्टर मुलीवर बलात्कार अन् तिची हत्या करण्य्यात आली. त्यानंतर सर्वत्र संतापाची लाट आहे. या घटनेने संपूर्ण देशाला धक्का दिला होता.
विकी डोनर अभिनेत्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर त्याच्या नवीन कवितेचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. तो तुटलेल्या हृदयाच्या इमोजीसह जोडला आहे. ही कविता समाजातील स्त्री-पुरुष असमानता दर्शवते. कवितेत अशा जगाची कल्पना आहे जिथे पुरुष आणि स्त्री यांची तुलनात्मक मांडणी केली आहे.
Kolkata Case : आज डॉक्टरांचा देशभरात संप! दवाखान्यांतील आरोग्य सेवा राहणार बंद; IMA ची घोषणा
काय आहे कोलकाता रेप मर्डर केस?
९ ऑगस्ट (शुक्रवार) रोजी कोलकाता येथील सरकारी आरजी कार हॉस्पिटलमध्ये ३१ वर्षीय पोस्ट ग्रॅज्युएट ट्रेनी (PGT) डॉक्टर मृतावस्थेत आढळून आली. या प्रकरणी 10 ऑगस्ट रोजी एकजणाला अटकर करण्यात आली होती. कोलकाता उच्च न्यायालयाने मंगळवारी कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरची हत्या आणि बलात्कार प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला. त्याचवेळी पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये डॉक्टरवर सामूहिक बलात्कार झाल्याचं समोर आलं आहे.
बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना याने सोशल मीडियावर कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणावर एक भावनिक कविता शेअर केली आहे.#KolkataDoctorDeath #KolkataDoctorCase #JusticeForMoumita pic.twitter.com/OrCCB89XeM
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) August 17, 2024