Crime : प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून खून; राज्यामध्ये संतापाची लाट, विद्यार्थ्यांचं आंदोलन

Crime : प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून खून; राज्यामध्ये संतापाची लाट, विद्यार्थ्यांचं आंदोलन

Kolkata Doctor Rape Case : पश्चिम बंगालमधील कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. (Rape Case ) या घटनेनंतर राज्यामध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा निषेध करत राज्यातील हजारो ज्युनियर डॉक्टर, रुग्णालय कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन केलं. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी संजय रॉय याला अटक केली आहे.

Natwar Singh: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नटवर सिंह काळाच्या पडद्याआड; 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हत्या करण्यात आली

कोलकाता येथील सरकारी आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये एका महिला पोस्ट ग्रॅज्युएट ट्रेनी (PGT) डॉक्टरचा अर्धनग्न मृतदेह आढळून आला. ती चेस्ट मेडिसिन विभागात द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी होती. तिच्यावर आधी बलात्कार आणि नंतर हॉस्पिटलमध्ये तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. तिचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये महिला डॉक्टरचं लैंगिक शोषण झाल्याचं समोर आले आहे.

सीसीटीव्ही फुटेज समोर

या घटनेची माहिती मिळताच कोलकाता पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तपास केला. पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेरे स्कॅन करण्यास सुरुवात केली आणि फुटेजच्या आधारे संभाव्य संशयितांची यादी तयार केली. पोलिसांना घटनास्थळी एक ब्लूटूथ हेडफोन सापडला आहे. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. यामध्ये सेमिनार हॉलजवळ संशयास्पद फिरताना दिसणारे संजय रॉय शुक्रवारी सकाळी हॉस्पिटलमधून बाहेर पडताना दिसले. त्यानंतर पोलिसांनी सर्व संशयितांना अधिक चौकशीसाठी रुग्णालयात बोलावलं.

112 खेळाडू, 69 इव्हेंट एकही गोल्ड नाही, टोक्योचं रेकॉर्डही तुटलं नाही.. भारताची ऑलिम्पिक मोहिम थांबली

वेगवेगळे जबाब दिले

चौकशीनंतर एका अधिकाऱ्याने जप्त केलेले ब्लूटूथ हेडफोन प्रत्येक संशयिताच्या मोबाईल फोनशी जोडण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान संजय रॉय यांचा फोन आपोआप या उपकरणाशी जोडला गेला, त्यानंतर त्यांना तात्काळ अटक करण्यात आली. पोलिसांच्या पथकाने चौकशी केली असता, संजयने गुन्ह्याची कबुली दिली. चौकशीदरम्यान संजयने सुरुवातीला वेगवेगळे जबाब दिल्याचा दावाही पोलीस अधिकाऱ्यांनी केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube