Government Schemes : बचत गट महिला समृध्दी कर्ज योजना आहे तरी काय?
Government Schemes : महिला समृध्दी कर्ज योजनेची आपण सविस्तर माहिती समजून घेणार आहोत. त्यामध्ये ही योजना काय आहे? या योजनेचे मुख्य उद्दिष्ट्य, पात्रता, अटी, फायदे, व्याजदर, कर्ज किती मिळणार? परतफेड कालावधी, अर्ज कुठे करायचा? कागदपत्रे कोणती? याबाबतची सर्व माहिती आपण सविस्तर जाणून घेऊयात… (Government Schemes Women Prosperity Loan Scheme)
‘दहशतवादी पुण्यात बॉम्बस्फोट घडवून आणू शकतात? पोलीस आयुक्तांच्या पत्राने खळबळ..
महिला समृध्दी कर्ज योजना : महिला व्यावसायिकांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी भारत सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य (समाज कल्याण) विभागाकडून महिलांसाठी हे धोरण राबविलं जात आहे. या योजनेंतर्गत महिला व्यवसायिकांना तसेच समाजातील उपेक्षित घटकातील महिला मागासवर्गीयांना आर्थिक मदत दिली जाते.
संजय राऊत पवारांची सोंगटी, थारा देऊ नका; राज ठाकरेंचा जिव्हारी लागणारा ‘मर्मी’ घाव
बँक आणि एनबीएफसी व्याज दर : महिला समृध्दी योजनेंतर्गत लागू केलेल्या कर्जापैकी 95 टक्के कर्ज दिले जाईल आणि उर्वरित 5 टक्के कर्ज राज्य वाहिनी एजन्सी (एससीए) किंवा स्वतः लाभार्थी देणार आहेत. मार्गदर्शकतत्त्वांमध्ये असे सूचित केले गेले आहे की, कर्जाच्या वितरणाच्या तारखेपासून घेतलेल्या कर्जाचा उपयोग कालावधी 4 महिन्यांच्या आत करावा.
महिला समृध्दी कर्ज योजना पात्रता :
– लाभार्थी मागासवर्गीय जात किंवा अनुसूचित जातीचा असला पाहिजे.
– बचत कर्ज गट (बचत गट) आणि समाजातील मागासवर्गीय घटकातील महिला उद्योजकच या कर्ज योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत.
– महिला लाभार्थ्यांचं किमान वय 18 ते 50 वर्षांपर्यत असावं.
– लाभार्थी बीपीएल श्रेणीतील असावेत.
अर्जदाराच्या वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी 98 हजार रुपयांपर्यंत असावे तर शहरी भागासाठी अर्जदार कुटुंबाचे एक लाख 20 हजार रुपयांपर्यंत असावे.
– कोणतेही गुन्हेगारी रेकॉर्ड असू नये.
कर्ज आवश्यक कागदपत्रे
– अर्ज
– जात प्रमाणपत्र
– बँक खाती
– उत्पन्न प्रमाणपत्र
– आधार कार्ड
– पासपोर्ट आकाराचा फोटो
– रहिवासी पुरावा (वीज बिल किंवा रेशन कार्ड)
– ओळख पुरावा – मतदार ओळखपत्र
– सेल्फ-ग्रुप मेंबरशिप आयडी कार्ड
महिला समृध्दी कर्ज योजना योजनेचे स्वरुप
– व्याज दर 4 टक्के
– परतफेडीचा कालावधी 3 वर्षे
– बचत गटांमार्फत ग्रामीण व शहरी भागातील महिलांना कर्ज पुरवठा
– प्रकल्प मर्यादा 5 लाखांपर्यंत बचत गटातील 20 सभासदांना प्रत्येकी 25 हजार रुपये.
– राष्ट्रीय महामंडळाचा सहभाग – 95 टक्के
– राज्य महामंडळाचा सहभाग -5 टक्के
– लाभार्थीचा सहभाग निरंक
महिला समृध्दी कर्ज योजना अर्ज करण्याची पध्दत : लाभत्यांना अर्ज करून लाभ घेण्यासाठी कर्ज मागणी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावे लागतील.
टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.