Government Schemes : पाईपलाईन अनुदान योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?
Government Schemes : पाईपलाईन अनुदान योजनेंतर्गत (Pipeline Subsidy Scheme)शेतकऱ्यांना 50 टक्के किंवा जास्तीत जास्त पंधरा हजार रुपये एवढे अनुदान दिले जाते. ज्यामध्ये पीव्हीसी पाईपसाठी (PVC Pipe)35 रुपये प्रति मीटर आणि जास्तीत जास्त 15 हजार रुपये त्याचबरोबर एचडीपीएसाठी (HDPA)50 रुपये प्रति मीटर जास्तीत जास्त 15 हजार रुपये या प्रमाणामध्ये अनुदान दिले जाते. एचडीपी पाईपसाठी अर्ज केले असता जास्तीत जास्त 300 मीटरपर्यंत अनुदान दिले जाते, तसेच पीव्हीसी पाईपसाठी अर्ज केला असता जास्तीत जास्त 500 मीटर पर्यंत अनुदान दिले जाते.
प्रसिद्धी मोहिम! ठाकरेंनीही 700 कोटी खर्च केले, विरोधकांच्या टीकेवर बावनकुळे कडाडले…
यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्ज करत असताना आपल्याकडे असणारा सिंचनाचा स्त्रोत याबद्दलची माहिती प्रविष्ट करणे बंधनकारक आहे. ज्यामध्ये शेततळे, विहीर किंवा इतर कोणत्या मार्गाने आपण सिंचन करत असाल तर त्याबद्दलची माहिती सादर करणे आवश्यक आहे. तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकेल. अन्यथा असे अर्ज वर्षानुवर्ष तसेच पडून राहतात. त्यावर कोणतीही पुढील कारवाई होत नाही त्याचबरोबर आपल्या सातबाऱ्याला देखील या सिंचनाची नोंद असणे बंधनकारक आहे.
‘ओडेला 2’ मध्ये तमन्ना भाटिया 800 कलाकारांसह क्लायमॅक्स करणार शूट, कुठ होणार शूटिंग?
अर्ज भरल्यानंतर महाडीबीटी पोर्टलद्वारे (MahaDBT Portal)एक लॉटरी जाहीर केली जाते. त्यामध्ये आपले नाव असल्यास आपल्याला प्राथमिक स्वरूपामध्ये काही कागदपत्रे सादर करावी लागतात. त्याच्यामध्ये आपल्या जमिनीचा सातबारा, 8अ, बँकेचे पासबुक व ज्या ठिकाणी आपण पाईप खरेदी करणार आहोत, त्या डीलरशिपचे कोटेशन आदी माहिती सादर करावी लागते.
पाईपलाईन योजनेंतर्गत अर्ज कसा करायचा? :
– महाडीबीटी पोर्टलवर गेल्यानंतर आपल्या आधार क्रमांकाने किंवा युजर आयडीने लॉग इन करा.
– त्यानंतर कृषी योजना या बटनावर क्लिक करा.
– त्यानंतर ‘अर्ज करा’ या बटनावर क्लिक करा.
– त्यानंतर सिंचन साधने व सुविधा यापुढे ‘बाबी निवडा’ हे बटनावर क्लिक करा.
– सिंचन साधने व सुविधा यांच्या अंतर्गत आपल्याला तालुका, गाव/शहर, सर्वेक्षण क्रमांक/गट क्रमांक, मुख्य घटक, बाब, उपघटक, परिमान, कपलर व्यास या बाबी गरजेनुसार निवडा.
– त्यानंतर ‘सहमत आहे’ या बॉक्सवर क्लिक करून ‘जतन करा’ या बटनावर क्लिक करा.
– त्यानंतर आपल्यासमोर एक विंडो ओपन होईल तेथे Yes किंवा No लिहिलेले असेल त्या ‘No’ बटनावर क्लिक करा.
– उजव्या कोपऱ्यामध्ये ‘अर्ज सादर करा’ असे लिहिलेले असेल त्यावर क्लिक करा.
– ‘पाहा’ या बटन वर क्लिक करा.
– आपल्या योजनेचा प्राधान्यक्रम निवडावा आणि ‘सहमत आहे’ या बटनावर क्लिक करून अर्ज सादर करा.
– या योजनेसाठी आपण 23 रुपये 60 पैसे जर पेमेंट केले असेल तरच आपला अर्ज हा यशस्वीपणे सादर केला जाईल.
टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.