संजय राऊत पवारांची सोंगटी, आयुष्यभर उंबरठ्यावर… राज ठाकरेंची जिव्हारी लागणारी टीका
छ.संभाजीनगर : संजय राऊत हे शरद पवारांची सोंगटी आहे यांच्या अमंगल कार्यालयातील ती करवली आहे, त्यामुळे ती आयुष्यभर उंबरठ्यावर राहणार अशी जिव्हारी लागणारी टीका मनसे प्रमुख राज ठाकरेंनी (Raj Thackeray) केली आहे. ते छ.संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यासह अनेक विषयांवर परखड मत व्यक्त केले. तसेच माझं मोहोळ उठलं तर ठाकरे आणि शरद पवारांना (Sharad Pawar) सभा घेणं पण अवघड होईल त्यामुळे त्यांनी माझ्या नादी लागू नये असा थेट दम राज ठाकरेंनी दिला आहे. (Raj Thackeray Attack On Sanjay Raut )
अजित पवारांनी कधीच जातीचं राजकारण केलं नाही; राज ठाकरेंनी केलं अजितदादांचं कौतुक
राज ठाकरे म्हणाले की, राऊत हे पवारांची सोंगटी असून, गेल्या लोकसभेनंतर पवारांची राष्ट्रवादी, ठाकरे गट विष पसरवायला हिरीरीने पुढे आहेत. त्यामुळे जे विष कालवतायत त्याला समाजाने थारा देऊ नये असे आवाहन राज ठाकरे यांनी नागरिकांना केले. राज ठाकरे विरूध्द मराठा समाज असा बातम्या लावल्या गेल्याचेही ते म्हणाले. मात्र, 2006 साली पक्ष स्थापनेपासून भूमिका एकाच आहे आणि ती म्हणजे आरक्षण आर्थिक निकषावर द्या असे ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितले. महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही. पुरून उरेल एवढ्या गोष्टी आपल्याकडे आहे. शिक्षण उद्योग उपलब्ध असताना इतर राज्यातील मुलांना सगळं काही मिळतं मात्र आपल्या राज्यातील मुलांना मिळत नाही.
“होय, माझ्यासह भाजप नेत्यांना तुरुंगात टाकण्याचं मविआचं षडयंत्र”; फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..
मनोज जरांगे यांच्या पाठीमागून शरद पवार उध्दव ठाकरे हे काम करत आहे. आंदोलन करणारे शरद पवार उध्दव ठाकरे गटाचे लोक होते. काल झालं त्यात उध्दव सेनेचा जिल्हा प्रमुख होता असेही राज यांनी यावेळी सांगितले. पवार ठाकरे यांनी समजून घ्यावं अमित शहा यांच्या विरोधातील मतदान होत ते तुमच्या प्रेम पोटी केलं नाही. संविधान बदलणार हे भाजप नेते म्हणाले त्यामुळे विरोधकांना फायदा झाला.
80 वर्षाचा माणूस म्हणतोय मणिपूर होईल, त्यांचा दंगली घडवण्याचा प्रयत्न…; राज ठाकरेंची पवारांवर टीका
राज ठाकरेंनीही काढलं पवारांचं वय
राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर एका भाषणादरम्यान अजित पवारांनी शरद पवारांचं वय झालं आहे आता तरी थांबणारा की नाही असे विधान केले होते. त्यानंतर अनेक स्तरातून टीका करण्यात आली होती. त्यानंतर आजच्या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनीही पवारांचं वय काढले आहे. ते म्हणाले की, 83 वर्षांचा माणूस राज्याची स्थिती मणिपूरसारखी होईल असे म्हणत आहे. असे विधान करण्याऐवजी त्यांनी मणिपूर होऊ नये यासाठी विचार करायला होत होता. शरद पवारांचे राजकारण हे जातीमध्ये द्वेष पसरून करणे हेच आहे. त्यामुळे निवडणुका येतील जातील यांच्या नादी लागू नका असे आवाहन राज यांनी सर्व समाजाला केले.
Video : नाशिकमध्ये अजितदादांची बुलेट सवारी; म्हणाले, तारूण्यात बऱ्याच जणींना घेऊन…
मोहोळ उठलं तर महागात पडेल
दुसऱ्या जातींबद्दल द्वेष पसरवण्याचे काम शरद पवार यांच्या पक्षापासून सुरू झाल्याचेही राज ठाकरे म्हणाले. मराठा दलीत लोकांनी यांच्या नादाला लागू नये. निवडणुका येतील जातील या जखमा बऱ्या होणार नाही असे म्हणत तुमचं राजकारण लक लाब माझ्या नादाला लागू नका असे म्हणत यांनी माझ्या दौरा गोंधळ घातला माझं मोहळ उठला तर यांना जमणार नाही. यांच्याकडे प्रस्थापित आहे. पण माझ्याकडे विस्थापित आहेत असा इशाराही राज यांनी पवार ठाकरेंना दिला.