‘तो चांगला व्यक्ती नाही’ कोलकाता डॉक्टर हत्या प्रकरणातील आरोपीच्या सासूने सांगितलं धक्कादायक सत्य

‘तो चांगला व्यक्ती नाही’ कोलकाता डॉक्टर हत्या प्रकरणातील आरोपीच्या सासूने सांगितलं धक्कादायक सत्य

Kolkata Doctor Murder Case : कोलकाता प्रशिक्षणार्थी डॉक्टर बलात्कार हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देशातील आरोग्य व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. देशभरात अनेक ठिकाणी डॉक्टरांनी आंदोलन सुरु केलं आहे. (Kolkata Doctor) या प्रकरणी संजोय रॉय नावाच्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. संजोय रॉयबाबत तिच्या सासूने अत्यंत धक्कादायक माहिती सांगितली आहे.

ममता बॅनर्जी गुन्हेगारांच्या पाठीशी, सत्य दडवलं जातंय; कोलकाता हत्याप्रकरणावरून भाजपचा आरोप

तीन महिन्यांची गरोदर

संजोय रॉयच्या सासूने सांगितलं की, ‘माझे आणि संजोयचे संबंध नेहमी ताणावाचे राहिलेले आहेत. त्याच्या आणि माझ्या मुलीचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्याचं हे दुसरं लग्न होतं. सुरुवातील सहा महिने सगळं व्यवस्थित होतं. माझी मुलगी तीन महिन्यांची गरोदर झाली. त्यावेळी तिचा गर्भपात झाला. त्यानंतर त्याने तिला त्रास देण्यास सुरुवात केली. ‘

आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानंतर माझ्या मुलीची तब्येत ठीक नसायची. मीच तिचा सर्व औषधांचा खर्च उचलला. तो काहीही पैसे द्यायचा नाही. संजोय हा चांगला व्यक्ती नाही. त्याला फाशी द्या किंवा त्याच्यासोबत काहीही करा. मी त्याच्या गुन्ह्याबाबत बोलणार नाही. पण, त्याने हे एकट्याने केले नसावे. त्याच्याकडे एकट्याने करण्याइतकी ताकद नाही असंही त्या म्हणाल्या आहेत’

पोस्टमार्टम रिपोर्ट समोर

मृत डॉक्टरचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे. यामध्ये तिच्या शरीरावर १६ जखमा झाल्याचं समोर आलंय, याशिवाय तिला नऊ अंतर्गत जखमा आहेत. तिचा गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. हत्या करण्यापूर्वी तिच्यावर बळजबरी (बलात्कार) करण्यात आला, असं रिपोर्टमधून समोर आलं आहे.

पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये उल्लेख आहे की, तिच्या गालावर, ओठांवर, नाकावर, मानेवर, हातांवर, गुढगे आणि तिच्या गुप्तांगावर जखमा आहेत. अतंर्गत नऊ जखमा आहेत. सर्व जखमा या मृत्यूपूर्वीच्या आहेत. त्यामुळे आरोपीने पीडित डॉक्टरवर क्रूरतेचा व्यवहार केल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने याप्रकरणात सु-मोटो याचिका दाखल करून घेतली आहे. याप्रकरणाची आजच सुनावणी झाली.

धक्कादायक! शाळेत चिमुरडीवर अत्याचार; अंगावर काटा आणणारी घटना, पोलिसांकडून कारवाईस दिरंगाई

कोर्टाची टिप्पणी

या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने हा फक्त डॉक्टर किंवा पश्चिम बंगाल इतकाच सीमित मुद्दा नाही. हा देशाचा मुद्दा झाला आहे. त्यामुळे यांची गंभीर दखल आम्ही घेतली आहे असंही कोर्टाने म्हटलं आहे. तसंच, पोली यंत्रेणवरही कोर्टाने ताशेरे ओढले आहेत. सात हजार लोक रुग्णालयात जात असताना पोलीस काय करत होते? असा प्रश्नही कोर्टाने उपस्थित केला आहे. तसंच, कॉलेजचे मुख्याद्यापक काय करत होते? ते या घटनेला आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न का करत होते असा थेट आणि गंभीर प्रश्नही कोर्टाने केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube