Download App

Paris Olympic 2024 : लक्ष्य सेनची प्रणॉयवर मात; उपांत्यपूर्व फेरीत दाखल

Paris Olympic : पॅरिस ऑलिम्पिक बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेनने हमवतन एच.एस प्रणॉयवर मात करत उपांत्यपूर्व दाखल झाला आहे.

Paris Olympic : पॅरिस ऑलिम्पिक (Paris Olympic) स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये लक्ष्य सेनने (Lakshya Sen) आपल्याच देशाच्या एचएस प्रणॉयचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत जागा बनवलीयं. लक्ष्य सेनने प्रणॉयचा 2.0 ने पराभव करत विजयाला गवसणी घातलीयं. ऑलिम्पिक खेळांच्या इतिहासात प्रथमच बॅडमिंटनच्या बाद फेरीत दोन भारतीय खेळाडू आमनेसामने भिडले. 22 वर्षीय लक्ष्य सेन आणि 32 वर्षीय एचएस प्रणॉय प्री-क्वार्टर फायनलमध्ये एकमेकांशी भिडले.

संभाजी महाराज छत्रपतींवर वादग्रस्त विधान! जितेंद्र आव्हाडांची गाडीच फोडली…

या सामन्यादरम्यान, पहिल्या गेमच्या मध्यापर्यंत सेनने चांगला खेळ केला. यामध्ये सेनने प्रणॉयला संधी दिली नाही. तो 11-6 ने आघाडीवर होता. त्यानंतर सेनने हा गेम 21-12 ने जिंकला. प्रणॉयला पहिल्या गेममध्ये सेनशी टक्कर देता आली नाही. त्याने संपूर्ण सामन्यावर वर्चस्व गाजवले. तर दुसऱ्या गेममध्येही सेनने प्रणॉयला संधी दिली नाही. हाफ टाईमला सेन 11-3 ने आघाडीवर होता. त्यानंतर सेनने एकतर्फी सामना 21-६ असा जिंकला.

एका रात्रीच होत्याचं नव्हत झालं; वायनाडमध्ये मृतांचा आकडा 254, तर 300 लोक बेपत्ता असल्याचा अंदाज

ऑलिम्पिक स्पर्धेत सेनने आपल्या पहिल्या सामन्यात केविन कॉर्डनचा 21-8, 22-20 असा पराभव केला होता. पराभवानंतर, कॉर्डनने डाव्या कोपराच्या दुखापतीमुळे चालू स्पर्धेतून माघार घेतली. अशा स्थितीत BWF स्पर्धेच्या नियमानुसार सेनच्या या सामन्याचा निकाल काढण्यात आला. त्यानंतर सेनने आपल्या गटातील ज्युलियन कारागी आणि क्रिस्टी यांना पराभूत करून अंतिम 16 मध्ये प्रवेश केला.

तर प्रणॉयने पहिला गेम गमावूनही 2 गेम जिंकून राऊंड ऑफ 16 मध्ये प्रवेश केला. याआधी, प्रणॉयने आपल्या पहिल्या गट सामन्यात जर्मन खेळाडू फॅबियन रॉथचा दोन गेमच्या लढतीत 21-18, 21-12 असा पराभव केला होता. तर महिला गटात पीव्ही सिंधूची विजयी मोहीम सुरूच आहे. सिंधूलाही अंतिम 16 मध्ये स्थान मिळवण्यात यश आले आहे.

follow us