संभाजी महाराज छत्रपतींवर वादग्रस्त विधान! जितेंद्र आव्हाडांची गाडीच फोडली…
Jitendra Awhad News : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची घटना घडलीयं. छत्रपती संभाजीराजे यांच्याबाबत विधान केल्याप्रकरणी आव्हाड यांच्या गाडीवर संतप्त कार्यकर्त्यांनी हल्ला केलायं. या हल्ल्यात कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांची गाडी फोडलीयं.
संभाजी महाराज छत्रपतींवर वादग्रस्त विधान! जितेंद्र आव्हाडांची गाडीच फोडली…
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केलायं. #jitendraawhad @ChhSambhajiraje pic.twitter.com/edygWQaHEB
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) August 1, 2024
काही दिवसांपूर्वी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचं हिरवं रक्त असल्याचं विधान संभाजी महाराज यांनी केलं होतं. आव्हाड यांच्या विधानानंतर स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केलायं. हल्ला झाल्यानंतर स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ल्याची जबाबदारी घेतलीयं.
IPL 2025 साठी नाही होणार मेगा लिलाव, शाहरुख खान का संतापला? वाचा, बैठकीची Inside Story
विशाळगड अतिक्रमणाचा विषय राज्यात चांगलाच तापला होता. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संभाजी महाराज छत्रपती यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. आव्हाड यांच्या विधानानंतर स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना थेट इशाराच दिला होता. अखेर आज ठाण्यात त्यांच्या गाडीवर हल्ला करत आव्हाडांच्या विधानाच निषेध केलायं.