…अजून तुमच्या घाणेरड्या सवयी गेलेल्या नाहीत; जितेंद्र आव्हाड यांचा ‘दादा’ नेत्यावर निशाणा

…अजून तुमच्या घाणेरड्या सवयी गेलेल्या नाहीत; जितेंद्र आव्हाड यांचा ‘दादा’ नेत्यावर निशाणा

Jitendra Awad on MLC Election : विधान परिषदेच्या निवडणुकीचा (MLC Election ) निकाल काल रात्री जाहीर झाला. मात्र, त्यानंतर कोण विजयी ही चर्चा राहिली बाजूला आता चर्चा सुरू आहे फक्त महाविकास आघाडीच्या फुटलेल्या मतांची. (Jitendra Awad) या सगळ्या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर एक पोस्ट करत फुटलेल्या आमदारांनी किती पैसे मिळाले याबाबात सांगितलं मोठे खुलासे केले आहेत.

MLC Election 2024 : जयंत पाटलांचा पराभव वेदनादायक सत्यजित तांबेंना अतीव दुःख

आज विधान परिषदेच्या निवडणुकीत जी काही मतं फुटली किंवा फोडण्यात आली, त्याचं एकमेव कारण म्हणजे पैसा आणि विकासनिधी. म्हणजे जनतेच्याच पैशाचा खेळ! विकासनिधी हा कुणी स्वतःच्या घरातून आणत नाही. जनतेच्या करातून सरकारी तिजोरीत जमा झालेला पैसा हा विकासनिधी म्हणून वापरला जातो. पण, या सरकारने तेही जमवले नाही. या सरकारने फक्त कर्जाचा डोंगर उभा केला अन् त्या कर्जाच्या डोंगरातूनच हे पैसे काढले जात आहेत. म्हणजेच, जनतेच्याच खिशाला कात्री लावण्याचे काम केले जातेय असा आरोप अव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे.

आपल्या पोस्टमध्ये आव्हाड पुढे म्हणाले, ‘पाच कोटी रूपये आणि शंभर कोटी रूपयांची कामे, अशी ऑफर प्रत्येक आमदाराला दिली जात होती. काही पैशांच्या अमीषाला बळी पडले. स्वतःच्या राजकीय अस्तित्वाविषयी काळजी नाही. स्वतःच्या राजकारणाविषयी पुढे जाण्याची इच्छा नसेल तर त्याला कोण काय करणार? असा सतापही त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, कालपर्यंत असा कुठलाही विषय समोर आला नव्हता. मात्र, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हा विषय समोर आणल्याने आता पुन्हा एकदा यावर नव्याने चर्चा सरु झाल्या आहेत.

ट्रॅपमध्ये अडकलेल्या बदमाश आमदारांना बाहेर काढणार; नाना पटोले प्रचंड संतापले

दरम्यान, यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, जे फुटले त्यांच्यावर थेट कारवाई करणार. या गद्दरांना बाहेरचा रस्ता दाखवणार आहोत. आम्ही जे घडलं त्याविषयी हायकमांडकडे रिपोर्ट पाठवला आहे. त्यांच्याशी एकदा बोलण झालं की आम्ही थेट निर्णय घेणार आहोत. या प्रकरणात कुठलीही समिती किंवा इतर काही नसून आता थेट निर्णय घेतला जाणार आहे. असले गद्दार पक्षात नकोत. त्यांना बाहेचाच रस्ता दाखवावा लागणार अशी थेट भूमिका पटोले यांनी काल घेतली आहे.

काय आहे पोस्टमध्ये?

आज विधान परिषदेच्या निवडणुकीत जी काही मते फुटली किंवा फोडण्यात आली, त्याचे एकमेव कारण म्हणजे पैसा आणि विकासनिधी. म्हणजे जनतेच्याच पैशाचा खेळ ! विकासनिधी हा कुणी स्वतःच्या घरातून आणत नाही. जनतेच्या करातून सरकारी तिजोरीत जमा झालेला पैसा हा विकासनिधी म्हणून वापरला जातो. पण, या सरकारने तेही जमविले नाही. या सरकारने फक्त कर्जाचा डोंगर उभा केला अन् त्या कर्जाच्या डोंगरातूनच हे पैसे काढले जात आहेत. म्हणजेच, जनतेच्याच खिशाला कात्री लावण्याचे काम केले जातेय. पाच कोटी रूपये आणि शंभर कोटी रूपयांची कामे, अशी ऑफर प्रत्येक आमदाराला दिली जात होती. काही पैशांच्या अमीषाला बळी पडले. स्वतःच्या राजकीय अस्तित्वाविषयी काळजी नाही; स्वतःच्या राजकारणाविषयी पुढे जाण्याची इच्छा नसेल तर त्याला कोण काय करणार? आजचा अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. यानंतर पुढे विधानसभा निवडणुकांना सामोरे जायचे आहे. पण, जे आमदार फुटले आहेत; त्यांची नावे आज रात्री किंवा उद्या बाहेर पडणारच आहेत. त्यामुळे आपला आमदार पैसे घेऊन फुटला आणि पक्षाशी गद्दारी केली, हे पुन्हा एकदा जाहीर होईल. या गद्दारीविरोधात प्रचंड संताप जनतेच्या मनात आहे. गद्दारी करणाऱ्यांविरुद्ध तसेच गद्दारी करायला लावणार्‍यांविरोधातही जनतेच्या मनात रोष आहे. पाच कोटी रूपये आणि १०० कोटींची विकासकामे हा दर ठरला होता. तुम्ही हे देऊन आमदारांना विकत घेऊ शकता; पण, जनतेला घेऊ शकत नाहीत. तुम्ही आमदारांना विकत घेताना खूप पैसे वाटले आहेत. आमदारांना विकत घेताना खूप , अगदी हजार कोटी रूपयांचा विकासनिधी दिलात. पण, तुम्हाला कुठेच यश मिळू शकला नाही. म्हणून तुम्ही १७ वरच अडकले. तेव्हा जनतेला विकत घेऊ शकतो, या भ्रमात राहून आम्ही विधानपरिषद जिंकली आता विधानसभा जिंकू , हे विसरून जा. जनतेच्या मनात तुमच्याबद्दल प्रचंड राग आहे. आजनंतर अधिक राग निर्माण होईल की अजून तुमच्या घाणेरड्या सवयी गेलेल्या नाहीत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube