एका रात्रीच होत्याचं नव्हत झालं; वायनाडमध्ये मृतांचा आकडा 254, तर 300 लोक बेपत्ता असल्याचा अंदाज

एका रात्रीच होत्याचं नव्हत झालं; वायनाडमध्ये मृतांचा आकडा 254, तर 300 लोक बेपत्ता असल्याचा अंदाज

Waynad Landslide : केरळच्या वाडयनाडमध्ये भूस्खलन झालं मात्र, एका भूकंपाने जसं होत्याचं नव्हत होतं तस चित्र येथे पाहायला मिळत आहे. दुभंगलेली घरं, चिखलांनी भरलेल्या नाल्या, रस्ते, मोठमोठ्या दगडांनी फाटलेली जमीन हे चित्र होतं मुडक्कई जंक्शन आणि जवळच्या चुरलमला शहराचं. (Landslide) भूस्खलनाच्या तडाख्यात (Waynad) सापडण्यापूर्वी हे ठिकाण स्थानिकांसाठी महत्त्वाचं व्यापारी केंद्र होतं. मंगळवारच्या भूस्खलनामुळे मुडक्कई आता नकाशावरून गायब झालं असून या संकटात गमावलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांचा आक्रोश काळजाला भिडत आहे. वायनाडमध्ये आतापर्यंत २५४ जणांचा मृत्यू झाला असून ३०० जण आणखीही बेपत्ता आहेत. या घटेनेने देशभरात हळहळ व्यक्त होती.

अतिवृष्टीमुळे धरणांतून विसर्ग, मात्र पाऊस अन् धरणसाठ्याचं गणित नेमकं काय? जाणून घ्या सविस्तर

आता या ठिकाणी मातीचे ढिगारे आणि डोंगरावरून पुराच्या पाण्याबरोबर वाहत आलेले भलेमोठे दगड पाहिलं तर एक दिवस अगोदरपर्यंत हे गजबजलेले जंक्शन आणि एक शहर होते यावर विश्‍वास ठेवणं कठीण आहे. एकवेळ पर्यटकांची आवभगत करण्यात व्यग्र असणारे गाव आणि ग्रामस्थ आता भूस्खलनामुळे ढासळलेल्या घराखाली मृतदेहांचा आणि जखमींचा शोध घेताना दिसत आहेत.

मुडक्कई हे लहान जंक्शनचं गाव तर चूरलमला ही बाजारपेठ आणि पक्क्या बांधकामांचं असलेले गाव. चूरलमला हे लोकप्रिय पर्यटनस्थळ असून तेथे सोचिप्परा सरोवर, वेल्लोलिप्पारा आणि सीता सरोवर यासारखे निसर्गरम्य ठिकाणं असून ते पर्यटकांना नेहमीच भूरळ पाडत असत. सुटीच्या काळात या ठिकाणी पर्यटकांची बऱ्यापैकी वर्दळ असे. परंतु मंगळवारच्या भूस्खलनाने चित्र बदललं.

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube