अतिवृष्टीमुळे धरणांतून विसर्ग, मात्र पाऊस अन् धरणसाठ्याचं गणित नेमकं काय? जाणून घ्या सविस्तर…

अतिवृष्टीमुळे धरणांतून विसर्ग, मात्र पाऊस अन् धरणसाठ्याचं गणित नेमकं काय? जाणून घ्या सविस्तर…

Heavy rain in state water measurement Units of rain and dams : बुधवारपासून राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत असल्याने अनेक नद्यांना पूर आला आहे तर पुणे, मुंबईतील अनेक भागात पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल होत आहे. त्यामुळे पाण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी अनेक धरणांतून विसर्ग सुरू झाला आहे. मात्र आपल्यापैकी अनेकांना पाऊस किंवा धरणातील पाणी मापणाच्या (water measurement) एककांबद्दल कुतूहल असते. त्यामुळे पाऊस अन् धरणसाठा (rain and dams) मोजण्याचं गणित नेमकं काय? पूर रेषा कशा आखतात जाणून घेऊ…

अर्चना पाटलांची खेळी फेल; आचारसंहिता भंग प्रकरणात खासदार ओमराजे निंबाळकरांना मोठा दिलासा

एक टीएमसी पाणी म्हणजे काय ?

1 घनफूट म्हणजे 28.31 लिटर्स पाणी
28.31 लिटर्स पाणी म्हणजे अंदाजे दोन बादल्या पाणी
1 दशलक्ष घनफूट (१एमसीएफटी) म्हणजे 10, 00, 000 घनफूट पाणी
1,000 दशलक्ष घनफूट म्हणजे 1 टीएमसी पाणी (एक अब्ज घनफूट पाणी )

‘कांगुवा’ मधील रॉकस्टार डीएसपीचा ‘फायर’ गाणे संपूर्ण भारतातील यूट्यूब चार्टमध्ये ठरला अव्वल

क्युसेक म्हणजे काय ?

– धरणातून सोडलेले पाणी क्युसेकमध्ये मोजतात.
– एक घनफूट प्रती सेकंद म्हणजेच एक क्युब पर सेकंद याचा अर्थ क्युसेक असा होतो.
– धरणातून 1000 क्युसेक विसर्ग केल्यास 1000 x 28.31 असे 28,310 लिटर्स पाणी प्रती सेकंदाला नदीपात्रात सोडले जाते.
– धरणातून जर 24 तासांत सतत 11,500 क्युसेक विसर्ग झाला तर धरणाची पातळी 24 तासांनंतर 1 टीएमसीने कमी होते.

MPSC Exam: एमपीएससीतही पूजा खेडकर प्रकरणाची पुनरावृत्ती? निवड यादीतील ८ जणांविरुद्ध तक्रार

क्युमेक म्हणजे काय ?

– क्युमेकमध्ये पाणी घनमीटर्समध्ये मोजले जाते.
– एक क्युमेक पाणी म्हणजे प्रती सेकंद 1000 लिटर्स पाणी
– 1000 क्युमेक पाणी सोडले जात असेल, तर 1000 असे 10 लाख लिटर्स पाणी प्रतीसेकंद वेगाने नदीपात्रात येते.

विधानसभेपूर्वी ठाकरे भाजपचे मनोमिलन?; चंद्रकांतदादांनी पुन्हा दिले संकेत

पूररेषा कशा आखतात ?

– धरणातून 30,000 क्युसेकने पाणी सोडल्याने नदीची पातळी जिथपर्यंत असते त्याला ‘पांढरी रेषा’ म्हणतात.
– सर्वसामान्य पूर मानला जातो.
– 20-25 वर्षांत नदी पात्र पांढरी रेषा ओलांडते.
– धरणातून 60,000 क्युसेकने पाणी सोडल्याने नदीची पातळी जिथपर्यंत असते त्याला ‘निळी रेषा’ म्हणतात.
– अतिवृष्टी झाल्यास 40-50 वर्षांत नदी पात्र निळी रेषा ओलांडते.
– धरणातून 1, 00,000 क्युसेकने पाणी सोडल्याने नदीची पातळी जिथपर्यंत असते त्याला ‘निळी रेषा’ म्हणतात.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube