विधानसभेपूर्वी ठाकरे भाजपचे मनोमिलन?; चंद्रकांतदादांनी पुन्हा दिले संकेत
Chandrakant Patil want Birthday wishes to Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना प्रत्यक्ष भेटूनच शुभेच्छा (Birthday wishes) द्यायला मला आवडेल. असं वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं. ते माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
मोठी बातमी : लाडक्या बहिणींना CM शिंदेंचा आणखी एक गिफ्ट : अशक्त तिजोरीवर चार हजार कोटींचा भार
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना प्रत्यक्ष भेटूनच शुभेच्छा द्यायला मला आवडेल. मी त्यांना मेसेज करेल. मात्र अशा मोठ्या नेत्याचा वाढदिवसाच्या दिवशी फोन लागत नाही. त्यामुळे माध्यमांसमोरच मला त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याची संधी मिळाली. याबद्दल मी माध्यमांचे आभार मानतो. त्यांना खूप चांगलं आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा देतो. असं म्हणत भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना भेटून शुभेच्छा देण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र यामुळे राजकीय वर्तुळात वेगळ्या चर्चांना उधाण आलय.
Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरचा गुलाबी स्कर्टमधील ग्लॅमरस लूक, चाहते फिदा
दरम्यान या अगोदर राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना देखील चंद्रकांत पाटील आणि संजय राऊत हे एकत्र आले होते. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या विधान भवनातील कार्यालयात उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट झाली होती. यावेळी चंद्रकांत पाटलांनी ठाकरे गटाच्या सर्व आमदारांचे स्वागत केलं. यावेळी देखील त्यांनी आपण एकत्र यायला हवं असं वक्तव्यही केलं होतं.
Pune Rain: मुरलीधर मोहोळांचा चौकशीचा सूर; पाणी सोडताना सावध का केल नाही? चौकशी करणार
मुंबई पदवीधर मतदार संघासाठी निवडणूक लढवत असलेले ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांना निवडून येण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळी देखील राज्याच्या राजकारणात नेमके काय बदल होणार याबद्दल चर्चा सुरू झाल्या होत्या. तसेच राज्याच्या राजकारणात विधकांनी एवढ्या आपुलकीने भेटून एकमेकांची विचारपूस करणे हे देखील कित्येक दिवसांनी पाहायला मिळाल्याचं बोललं जात होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांच्या विधानाने वेगळेच संकेत मिळत आहेत.