Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरचा गुलाबी स्कर्टमधील ग्लॅमरस लूक, चाहते फिदा

Amruta Khanvilkar: अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक बॉलीवूड आणि मराठी सिनेमांमध्ये काम करून तिने अभिनयाची छाप पाडली.

सध्या अमृता 'ड्रामा ज्युनियर्स' या झी मराठीवरील रिएलिटी शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे. या शोसाठी अभिनेत्रीने खास लूक केला होता.

गुलाबी रंगाचा फ्लोरल प्रिंट स्कर्ट आणि टॉपमध्ये अभिनेत्रीने फोटोशूट केलं आहे. केसांचा बन बांधून तिने ग्लॅमरस लूक केला आहे.

फोटोसोठी अमृताने खास पोझही दिल्या आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री जणू एखाद्या परीसारखीच दिसत आहे.

अभिनेत्रीबरोबरच अमृता एक उत्तम नृत्यांगणादेखील आहे. "वाजले की बारा" या लावणीमुळे ती प्रसिद्धीझोतात आली होती.

अमृताच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
