अर्चना पाटलांची खेळी फेल; आचारसंहिता भंग प्रकरणात खासदार ओमराजे निंबाळकरांना मोठा दिलासा
MP Omraje Nimbalkar : खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार देण्यात आली होती. मात्र त्या प्रकरणात ओमराजेंना दिलासा मिळाल असून त्यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल होणार नाही. (Omraje Nimbalkar) ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्यासह त्यांच्या अंगरक्षकांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा नोंद करा आणि एफआयआर प्रत जिल्हा निवडणूक आयोगाकडे द्या, असे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिले होते.
आमदार कैलास पाटील एमपीएससीतही पूजा खेडकर प्रकरणाची पुनरावृत्ती? निवड यादीतील ८ जणांविरुद्ध तक्रार
दरम्यान, या प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. ओमराजे निंबाळकरांवर गुन्हा दाखल होणार नसून ओमराजे हे स्वतः उमेदवार असल्याने त्यांना मतमोजणी केंद्रात प्रवेश दिला जातो त्यामुळे गुन्हा दाखल होण्यापासून त्यांना दिलासा मिळाला आहे. गुन्हा दाखल करण्याच्या आदेशात दुरुस्ती करण्यात आलेली आहे. आमदार कैलास पाटील यांच्यासह ओमराजे यांचे २ व कैलास पाटील यांचा १ अशा ४ जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी तसे आदेश दिले होते. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी त्यांचे उमेदवार प्रतिनिधी रेवनसिध्द लामतुरे यांच्या माध्यमातून जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली होती आचारसंहिता भंगाची तक्रार करण्यात आलेली होती.
अजित पवार गटाची तक्रार
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी त्यांच्या उमेदवार प्रतिनिधी रेवनसिध्द लामतुरे यांच्या माध्यमातून जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली होती. त्यांनी आरोप केला होता की लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील हे आपल्या अंगरक्षकांसह मतमोजणी केंद्रावर फिरत होते. त्यामुळे मतमोजणी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये दबाव निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला होता.
सिसीटीव्ही फुटेज तपासणी
तक्रारीवरून निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून आचारसंहिता भंग झाला की नाही याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. ओमराजे हे उमेदवार असले तरी ते अंगरक्षकांसह मतमोजणी केंद्रात जावू शकत नाहीत, असं तक्रारीत नमूद केले होते.