Pune Rain Alert: पावसाचा हाहाकार! 5 जणांचा मृत्यू, जाणून घ्या ताजे अपडेट

Pune Rain Alert: पावसाचा हाहाकार! 5 जणांचा मृत्यू, जाणून घ्या ताजे अपडेट

Pune Rain Alert: बुधवारपासून राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत असल्याने अनेक नद्यांना पूर आला आहे तर पुणे (Pune), मुंबईतील (Mumbai) अनेक भागात पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल होत आहे.

तर दुसरीकडे मिळालेल्या माहितीनुसार,मागच्या 24 तासांमध्ये राज्यात मुसळधार पावसामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर 02 जण बेपत्ता झाले आहे. बदलापूरच्या बारवी डॅममध्ये दोन जण वाहून गेले असल्याची माहिती समोर आली आहे.

विजेचा शॉक लागून तिघांचा मृत्यू

अंडा भुर्जीची गाडी सुरक्षितस्थळी हलविताना विजेचा धक्का लागून तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना भिडे पुलाजवळील पुलाची वाडी परिसरात गुरुवारी (25जुलै) पहाटे तीनच्या सुमारास घडली. अभिषेक अजय घाणेकर, आकाश विनायक माने आणि शिवा जिदबहादुर परिहार अशी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.

पाण्याची पातळी वाढत असल्याने अंडा भुर्जीची गाडी सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी हे तिन्ही तरुण गेले होते मात्र गाडीमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने त्यांना विजेचा धक्का बसला . त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ताम्हिनी घाटात एकाचा मृत्यू

तर ताम्हिनी घाटात (Tamhini Ghat) देखील मुसळधार पावसामुळे एकाच मृत्यू झाला आहे. माहितीनुसार, पुणे-ताम्हिणी-कोलाड रस्‍त्‍यावर आदरवाडी येथे दगड कोसळल्याची घटना गुरुवारी (25 जुलै) घडली होती. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे.

‘लाडकी बायको योजना सुरु करा’, जयंत पाटलांची मुख्यमंत्री शिंदेंकडे ‘अजब’ मागणी

अकोला येथे बुडून एकाचा मृत्यू

अकोल्यात कारंजा रमजापूर लघू प्रकल्पातच्या बॅकवॉटरमध्‍ये एक जण पोहण्‍यासाठी गेले असता तो पाण्यात बुडाला होता. आज त्यांचा मृतदेह शोध व बचाव पथकास आढळला आहे. सुरज दिलीप शेगोकार असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube