Sarabjot Singh : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत मनू भाकर (Manu Bhaker) बरोबर नेमबाजीत कांस्यपदक जिंकणारा सरबज्योत सिंह (Sarabjot Singh) पुन्हा चर्चेत आला आहे. यावेळी त्याने असा निर्णय घेतला आहे ज्याचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. हरियाणा सरकारने (Haryana Government) सरबज्योतला क्रीडा विभागात उपसंचालक पद दिले होते. मात्र सरबज्योतने पद स्वीकारण्यास नकार दिला आहे. नेमबाजीच्या तयारीलाच जास्त महत्व देत त्याने पद घेण्यास नकार दिला आहे. यानंतर सरबज्योतनं सांगितलं की मला आधी नेमबाजीवर लक्ष केंद्रीत करायचं आहे. मला नेमबाजी करायची आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत मी नोकरी करू इच्छित नाही.
पॅरिसमध्ये शेतकऱ्याच्या पोरनं फडकावला तिरंगा; जाणून घ्या, कोण आहे कांस्य जिंकणारा सरबज्योत सिंग
मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी देशासाठी कांस्यपदक (Paris Olympics) जिंकले. या दोघांच्या जोडीने दक्षिण कोरियाच्या नेमबाजांचा पराभव केला होता. सरबज्योत सिंगचा जन्म अंबाला येथील बरारा येथे झाला असून त्याचे वय केवळ 22 वर्षे आहे. सरबज्योतचे वडील जतिंदर सिंग हे शेतकरी आहेत तर, आई हरदीप कौर गृहिणी आहे. सरबज्योतने अंबाला कँटमधील एआर शूटिंग अकादमीमध्ये शूटिंगचे प्रशिक्षण घेतले असून, प्रशिक्षक अभिषेक राणा यांनी त्याला प्रशिक्षित केले आहे.
सरबज्योत सिंगला खेळामध्ये जिंकण्याची जुनी सवय आहे. यापूर्वी त्याने 2019 मध्ये ISSF ज्युनियर विश्वचषक जिंकला होता. 2021 मध्ये त्याने जागतिक चॅम्पियनशिपमध्ये एकेरी आणि सांघिक स्पर्धांमध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकले आहे. 2023 मध्येही त्याने याच कामगिरीची पुनरावृत्ती केली आणि आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवत पदार्पणातच कांस्यपदकाला गवसलणी घातली.
स्वत: चा देश सोडत दोन देशांसाठी ऑलम्पिक पदकांना गवसणी; कोण आहे Manu Bhaker ची पिस्टल कोच?