Download App

Video : बेरोजगारीमुळेच संसदेवर हल्ला; मोठं विधान करत राहुल गांधींनी मोदींवर फोडलं खापर

  • Written By: Last Updated:

Rahul Gandhi On Parliament Security Breach : संसदेवर नुकत्याच करण्यात आलेल्या स्मोक हल्ला हा देशातील वाढती बेरोजगारी आणि महागाई (Unemployment) असल्याचं मोठं विधान काँग्रेस नेते राहु गांधींनी केले आहे. बेरोजगारी आणि महागाईमुळे ही घटना घडल्याचे सांगत केंद्र सरकारच्या धोरणांमुळे ही घटना घडल्याचं खापर राहुल गांधींनी (Rahul Gandhi) मोदी सरकारवर फोडलं आहे. मोदींच्या धोरणामुळे देशातील नागरिकांना रोजगार मिळत नसून लोकसभेच्या सुरक्षेचा भंग होण्याचे मुख्य कारण बेरोजगारीचं हेच आहे. सध्या भारतीय लोकांची सर्वात मोठी समस्या बेरोजगारीची असल्याचेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

‘अण्णा, तुमचं आंदोलन आम्हाला परवडणार नाही’; CM शिंदेंचा फोन, अण्णांचीही हसून दाद

काय म्हणाले राहुल गांधी?

संसदेवर 13 डिसेंबर रोजी झालेल्या स्मोक हल्ल्याचे मुख्य कारण देशातील बेरोजगारी असून, तरुणांनी केलेल्या या हल्ल्यानंतर बेरोजगारीचा प्रश्न किती गंभीर झाला आहे हे दिसून येत आहे. देशातील प्रमुख समस्या बेरोजगारी असून, पंतप्रधान मोदींच्या (PM Modi) धोरणांमुळे देशातील तरुणांना रोजगार मिळत नाहीये.

हल्ल्यानंतर आठ कर्मचारी निलंबित

दुसरीकडे 13 डिसेंबरला संसदेवर झालेल्या स्मोक अटॅकनंतर सुरक्षेत त्रुटी राहिल्याप्रकरणी आठ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. 2001 मध्ये संसदेवर भीषण दहशतवादी हल्ला झाला होता. त्याच दिवशी अशाप्रकारची घटना पुन्हा घडणे यामुळे चिंता वाढली आहे. आतापर्यंत या प्रकरणात सहा जणांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडे कसून चौकशी केली जात आहे.

BJP : CM पद गेले अन् राजकारणही फिरले; खुर्ची गेलेल्या 11 पैकी 8 नेत्यांची नवी इनिंग!

संसदेत घुसण्यासाठी बनवले होते A अन् B प्लॅन

संसदेची सुरक्षा भेदत घुसखोरी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्यानंतर सर्व घटनेमागे मास्टरमाइंड असणाऱ्या ललित झा (Lalit Zha) याने चौकशीदरम्यान संसदेत घुसण्यासाठी दोन प्लॅन बनवण्यात आल्याचा मोठा खुलासा चौकशीदरम्यान केला आहे. प्लॅन A नुसार सागर शर्मा आणि मनोरंजन डी त्यांच्याकडे पास असल्याकारणाने संसदेत जातील असे निश्चित करण्यात आले. तर, संसदेच्या बाहेर महेश आणि कैलाश हे दोघे संसदेच्या बाहेर पोहचून स्मोक बॉम्ह जाळत घोषणाबाजी करतील असे ठरण्यात आले. मात्र, योजनेनुसार, महेश आणि कैलाश गुरुग्राममधील विशाल उर्फ ​​विक्कीच्या घरी पोहोचले नाहीत. त्यामुळे  तेव्हा अमोल आणि नीलम यांना हे काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याची जबाबदारी सोपण्यात आली होती.

घुसखोरी नंतर लपण्याची योजना

संसदेत घुसखोरीची घटना घडवून आणल्यानंतर ललितने लपण्याची योजना आखली होती. या प्लॅनमध्ये महेशला राजस्थानमध्ये लपण्यास मदत करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. कैलास आणि महेश चुलत भाऊ असून, महेश हा मजुरीचे काम करतो. घटनेच्या दिवशीचे सर्व अपडेट ललित, महेश आणि कैलाश टीव्हीवर घेत होते. महेशने त्याचे ओळखपत्र वापरून गेस्ट हाऊसमध्ये ललितची राहण्याची व्यवस्था केल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे.

Tags

follow us