Rahul Gandhi : ‘शरद पवार पंतप्रधान नाहीत’; अदानींच्या प्रश्नावर राहुल गांधींचं थेट उत्तर

Rahul Gandhi : ‘शरद पवार पंतप्रधान नाहीत’; अदानींच्या प्रश्नावर राहुल गांधींचं थेट उत्तर

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारलाही धारेवर धरले. कोळशाच्या किंमती चुकीच्या दाखवून वीजबिलात फसवणूक करत गौतम अदानी यांनी विजेच्या दरात वाढ केली. नागरिकांच्या खिशातून अदानींनी बारा हजार कोटी रुपये काढून घेतले, असा थेट आरोप राहुल गांधी यांनी केला.

यानंतर पत्रकारांनी त्यांना तुम्ही शरद पवार (Sharad Pawar) यांना प्रश्न का नाही विचारत कारण, इंडिया आघाडीचा विरोध असतानाही ते गौतम अदानी यांची भेट घेतात असे विचारले. या प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले, शरद पवार काही देशाचे पंतप्रधान नाहीत. पंतप्रधान मोदीच अदानींना वाचवत आहेत. शरद पवार नाही. ज्यावेळी शरद पवार पंतप्रधान बनतील आणि त्यावेळी जर ते अदानींना वाचविण्याचा प्रयत्न करतील त्यावेळी माझे प्रश्न तयार असतील. मी त्यांनाही प्रश्न विचारेन.

Firecracker Blast : तामिळनाडूत फटाका कारखान्यांत भीषण स्फोट; 14 जणांचा मृत्यू

हा तर सरळ वीजचोरीचाच प्रकार

फायनान्शियल टाइम्सच्या रिपोर्टमध्ये अदानींच्या कंपनीने कोळशाची कमी दरात खरेदी केली पण, दर जास्त दाखवले असा दावा करण्यात आला आहे. या रिपोर्टवरून काँग्रेसने मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. वीजचोरीचेच हे प्रकरण आहे असा आरोप राहुल गांधी यांनी केला. अदानींमध्ये असे काय आहे की भारत सरकार त्यांची चौकशी करत नाही, असा सवालही राहुल गांधी यांनी उपस्थित केला.

‘तो’ घोटाळा 32 हजार कोटींचा

गौतम अदानी इंडोनेशियात कोळसा विकत घेतात आणि भारतात त्याचा दर दुप्पट दाखवला जातो. ते कोळशाच्या किंमती चुकीच्या पद्धतीने दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान अदानींना संरक्षण देत आहेत. जगातल्या अन्य देशांत याचा तपास सुरू आहे पण, भारतात मात्र अदानी यांना क्लिन चीट देण्यात आली. ते वाट्टेल ते करू शकतात. पण, लोकांनी 32 हजार कोटींचा आकडा लक्षात ठेवावा. राहुल गांधी यांनी याआधी गौतम अदानी यांच्यावर 20 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यानंतर आज त्यांनी हा घोटाळा वीस हजार कोटींचा नसून 32 हजार कोटींचा असल्याचा आरोप केला.

Nilam Gorhe : राणे कायद्याचे अभ्यासक आहेत का? दंगलीच्या आरोपांवर गोऱ्हेंचा सवाल

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज