parliament session : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी-विरोधकांमध्ये चांगलीच रणधुमाळी सुरु आहे. या रणधुमाळीमध्ये विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडलायं, या अविश्वास प्रस्तावावर संसदेत चर्चा सुरु आहे. विरोधकांचा ‘इंडिया’ गट म्हणजे अहंकारी गट अन् संधीसाधू असल्याचं म्हणत केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपविरहित खासदारांना चांगलंच खडसावलं आहे. तसेच विरोधकांनी मांडलेल्या अविश्वास प्रस्तावाला त्यांनी कडाडून विरोध केला आहे.
सिंधिया म्हणाले, विरोधकांना देशाची, पंतप्रधानपदाची, राष्ट्रपतीपदाची नाहीतर स्वत:च्या स्थितीची काळजी आहे. विरोधकांनी मोदींविरोधात वापरलेल्या शब्दावरुन त्यांनी देशाची माफी मागितली पाहिजे, विरोधकांनी धीर धरावं, ऐकावं, जास्त उत्साहीत होऊ नये, असं म्हणत त्यांनी शेलक्या शब्दांत समाचार घेतला आहे.
सॅनिटरी पॅडवरून हत्येचा उलगडा!, पतीने रचलेल्या कटात भाच्याचीही साथ
तसेच विरोधकांनाच स्वत:च्या अविश्वास प्रस्तावावर विश्वास नसून 2011 मध्ये जेव्हा नाकाबंदी 100 दिवसांपेक्षा अधिका काळ चालली तेव्हा तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग गप्प का होते? हे कोणतं राजकारण? विरोधकांचा संधीसाधू विचार मला जनतेसमोर उघड करायचा असल्याचंही ते म्हणाले आहेत.
Ishan Khattar लाईव्हचा कॅमेरा बंद करायचा विसरला अन् झालं असं काही…
लोकसभेतील अमित शाहांचे सर्व दावे खोटे; राहुल गांधींच्या मदतीसाठी ‘कलावती बांदूरकर’ मैदानात
मणिपूर घटनेवरही भाष्य :
मणिपूरच्या खासदाराने 1993 मध्ये विधान केले होते. राज्य सरकार हतबल झाले असून पैसे नाहीत. सुरक्षा दलांसाठी शस्त्रास्त्रे खरेदी करण्यासाठीही राज्य सरकारकडे पैसे नव्हते. मणिपूर हा भारताचा एक भाग असून याचा परिणाम संपूर्ण देशावर होणार आहे, हे काँग्रेसच्या ऐकावं.
दरम्यान, ज्योतिरादित्य सिंधिया बोलत असताना सभागृहात विरोधकांकडून गदारोळ घालण्यात आला आहे. सिंधियांचं भाषण सुरु असतानाच विरोधकांनी सभात्याग केला.
