Paytm Crisis : आरबीआयने पेटीएमवर (Paytm Crisis) जेव्हापासून निर्बंध लादले तेव्हापासून पेटीम कायम चर्चत आहे. एकीकडे कंपनीचे शेअर्स घसरत आहेत. दुसरीकडे ग्राहकांचे पैसे अडकल्याने ते देखील चिंतेत आहेत. कारण आता ॲप बंद झाले तर आपले पैसे जाणार का? UPI,QR आणि Soundbox पूर्वीप्रमाणे वापरता येणार का? असे अनेक प्रश्न ग्राहकांना पडले आहेत. त्यामुळे पेटीएमने यासर्व प्रश्नांची उत्तर दिली आहेत.
किंग खानने ‘वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2024’च्या परिषदेत हॉलीवूडच्या कामाबद्दल थेटच सांगितलं, म्हणाला…
रिचार्ज आणि बिल पेमेंट करता येणार?
आरबीआयकडून पेटीएम पेमेंट बँकेवर निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे पेटीएमच्या ॲपवर कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे तुम्ही पूर्वीप्रमाणेच पेटीएमवरून रिचार्ज आणि बिल पेमेंट करू शकता. तसेच कंपनीने सांगितले आहे की, ग्राहकांनी निश्चिंत रहावं कारण पेटीएम त्यांच्या सुविधेसाठी वेगवेगळ्या प्रकारचे पेमेंट ऑप्शन्स आणत आहे.
पार्थ पवारांच्या उमेदवारीच्या चर्चेवर रोहित पवारांचे टीकास्त्र; म्हणाले, ‘विचारवंत राज्यसभेवर….’
इतर सेवा सुरू राहणार का?
पेटीएम ॲपवरून दिल्या जाणाऱ्या इतर सेवा म्हणजेच फिल्म तिकीट बुकिंग, फ्लाईट बुकिंग, ट्रेन तिकीट बुकिंग यावर कोणताही परिणाम होणार नाही. आत्ताच नाही तर 29 फेब्रुवारी 2024 नंतर देखील पेटीएमवरील या सर्व सेवा अबाधित चालू राहणार आहेत.
पेटीएम साउंड बॉक्स आणि पेटीएम कार्ड मशीन सुरू राहणार?
पेटीएमने सांगितलं आहे की, पेटीएमकडून दिले जाणारे साऊंड बॉक्स आणि पेटीएम कार्ड मशीन या सेवा देखील पहिल्यासारख्याच सुरळीत सुरु राहणार आहेत. त्यामुळे तुम्ही आता देखील पेटीएम किंवा साउंड बॉक्स आणि कार्ड मशीन यासारख्या ऑफलाइन मर्चंट पेमेंट नेटवर्क प्रॉडक्टच्या सहाय्याने सहज व्यवहार करू शकता.
मोठा निर्णय! वैद्यकीय महाविद्यालयात इंटर्नशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार दरमहा 18 हजार
पेटीएम पेमेंट बँक वॉलेटच काय होणार?
सध्या तुमच्या पेटीएम वॉलेटमध्ये असलेला बॅलन्स तुम्ही वापरू शकता. मात्र 29 फेब्रुवारी 2024 नंतर पेटीएम पेमेंट बँक वॉलेटमध्ये पैसे टाकता येणार नाहीत. तसेच त्यावरून कोणताही व्यवहार करता येणार नाही.
पेटीएम बँकमध्ये ग्राहकांचे पैसे सुरक्षित आहेत का?
भारतीय रिझर्व्ह बँकेने सांगितल्याप्रमाणे पेटीएम पेमेंट बँक 29 फेब्रुवारी 2024 नंतर त्यांच्या बँक अकाउंट आणि वॉलेटमध्ये कोणतेही नवे डिपॉझिट किंवा क्रेडिट करू शकणार नाही. तसेच आरबीआयकडून हे देखील स्पष्ट करण्यात आलं आहे की, तुमच्या पेटीएम वॉलेटमध्ये पैसे असतील तर ते तुम्ही आत्ता आणि 29 फेब्रुवारी 2024 नंतर देखील काढून घेऊ शकता. यावर कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळे ग्राहकांचा पैसा पेटीएम बँकेमध्ये सुरक्षित आहे.