Shashi Tharur : खासदार महुआ मोइत्रा यांच्यासोबतच्या व्हायरल फोटोंवर अखेर काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी मौन सोडलं आहे. फोटो व्हायरल करण्याचं कृत्य म्हणजे खालच्या थराचं राजकारण असल्याचं स्पष्टीकरण काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी केली आहे. मोईत्रा यांच्यासोबतचे व्हायरल फोटो म्हणजे खालच्या थराचं राजकारण असल्याचं थरुर म्हणाले आहेत. तसेच हा गंभीर मुद्दा नसून हा फोटो नेमक्या कोणत्या दिवसाचा आहे, याबाबतही त्यांनी थेटपणे भाष्य केलं आहे.
लेट्सअप नवदुर्गा स्पेशल: ‘विशेष’ विद्यार्थ्यांसाठी शाळा चालवणाऱ्या विशाखा नाडकर्णी यांची मुलाखत I
शशी थरुर म्हणाले, माझे जीवन लोकांसाठी समर्पित आहे. असे ट्रोल हे स्वस्त राजकारणाचा भाग आहेत. माझ्या मते हा गंभीर मुद्दा नाही. बर्थडे पार्टीदरम्यान काढलेल्या फोटोचे क्रॉप्ड व्हर्जन दाखवून त्याला ट्रोल केले जात आहे. हे स्वस्त राजकारण आहे.
नगर दक्षिण लोकसभा निवडणूक लढवणार का? बाळासाहेब थोरातांनीच दिले उत्तर
मोइत्रा माझ्यासाठी मुलासारखी आहे. खासदार महुआ मोइत्रा माझ्यापेक्षा 20 वर्षांनी लहान आहे. मोइत्रा यांच्या वाढदिवसाची पार्टी होती, पार्टीमध्ये माझ्या बहिणीसह सुमारे 15 लोकांचा सहभाग होता. पार्टीमधलं संपूर्ण फोटो दाखवण्याऐवजी ते क्रॉप करून पसरवले जात असल्याचंही ते म्हणाले आहेत.
मराठा आरक्षणाला EWS चा पर्याय दिला का? शिंदे सरकारच्या शासकीय जाहिरातीवर चव्हाणांचा सवाल
मी अशा ट्रोलला महत्त्व देत नाही, लोकांसाठी काम करण्यात व्यस्त आहेत. पार्टीमधील फोटो एक गुप्त बैठक म्हणून पसरवत आहेत, पण मग प्रश्न पडतो की फोटो कोणी क्लिक केला? असा सवालही शशी थरुर यांनी केला आहे.
काही दिवसांपूर्वी संसदेत प्रश्न विचारण्यासाठी महागड्या भेटवस्तू स्वीकारल्याचा आरोप महुआ मोइत्रा यांच्यावर करण्यात आला होता. त्यावेळी त्या वादात सापडल्याचं समोर आलं होतं. मोइत्रा महागड्या वस्तू घेऊन संसदेत प्रश्न विचारत असल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला होता.