टेलिग्रामवर आता पायरसीला लगाम; केंद्र सरकारची नोटीस, 3142 चॅनेल्स रडारवर

माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अंतर्गत टेलिग्रामला नोटीस बजावत त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून पायरेटेड कन्टेन्ट तात्काळ हटवण्याचे निर्देश दिले आहेत.

Untitled Design 4

Untitled Design 4

Piracy on Telegram now under control; Central government notice : टेलिग्रामवर पायरसीविरोधात केंद्र सरकारने मोठी कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अंतर्गत टेलिग्रामला नोटीस बजावत त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून पायरेटेड कन्टेन्ट तात्काळ हटवण्याचे निर्देश दिले आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्म्सकडून आलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली असून, मोठ्या प्रमाणात चित्रपट आणि वेब सिरीजची बेकायदेशीर पद्धतीने देवाणघेवाण टेलिग्रामवर होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

जिओ सिनेमा, हॉटस्टार, अमेझॉन प्राईम व्हिडिओ आणि इतर ओटीटी प्लॅटफॉर्म्सने मंत्रालयाकडे तक्रार करत सांगितले की, त्यांच्या कॉपीराईट असलेल्या चित्रपट आणि वेब सिरीज टेलिग्रामवरील अनेक चॅनलद्वारे मोफत प्रसारित केल्या जात आहेत. या तक्रारींची चौकशी केल्यानंतर मंत्रालयाने केलेल्या तपासात तब्बल 3,142 टेलिग्राम चॅनल्सवर पायरेटेड कन्टेन्ट वितरित होत असल्याचे उघड झाले आहे. या चॅनल्सवर नव्याने प्रदर्शित झालेले चित्रपट तसेच लोकप्रिय वेब सिरीज बेकायदेशीरपणे शेअर केल्या जात असल्याचं देखील समोर आलं आहे.

सामान्यतः चित्रपट किंवा वेब सिरीज पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये जातात किंवा जिओ सिनेमा, हॉटस्टार, अमेझॉन प्राईम व्हिडिओसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मचे सब्स्क्रिप्शन घेतात. मात्र काही वापरकर्ते टेलिग्रामवर अशा कंटेंटचा शोध घेतात, कारण तेथे हा कंटेंट अनेकदा मोफत उपलब्ध करून दिला जातो. मात्र अशा प्रकारे पायरेटेड चित्रपट किंवा वेब सिरीज पाहणे किंवा शेअर करणे हे कायद्याने गुन्हा ठरू शकते, असा इशारा सरकारकडून देण्यात आला आहे.

भारतातील कॉपीराईट कायद्यांनुसार, एखादा चित्रपट किंवा वेब सिरीज तयार झाल्यानंतर त्याच्या प्रसारणाला पूर्ण अधिकार हा केवळ निर्मात्यांकडे किंवा अधिकृत परवाना घेतलेल्या प्लॅटफॉर्मकडेच असतो. कोणत्याही परवान्याशिवाय तो कंटेंट इतरत्र प्रसारित करणे किंवा शेअर करणे हे पूर्णपणे बेकायदेशीर असून त्यासाठी दंड किंवा तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

अजितदादा सुरक्षित नाही तर कुणीही नाही… सभागृहात अमित देशमुख कडाडले रोहित पवारांचाही दुजोरा

दरम्यान, टेलिग्रामने देखील या महिन्याच्या सुरूवातीला आपले नवीन अपडेट लॉन्च केले आहे. आवृत्ती 12.5.0 मध्ये ग्रुप्स, चॅट्स आणि मीडिया वापरासाठी अनेक नवीन फीचर्स समाविष्ट करण्यात आले आहे. या अपडेटमध्ये सदस्य टॅग्ज, खाजगी चॅटसाठी अधिक गोपनीयता नियंत्रण, gif कॅप्शन आणि एडिटिंग, फोटोंमधून इन्स्टंट स्टिकर्स तयार करण्याची सुविधा तसेच टेलिग्रामवर अँप्स आणि वेबसाइट्समध्ये लॉग इन करण्याचा नवीन पर्याय देण्यात आला आहे.

नवीन फीचरनुसार, ग्रुपमधील सदस्य आता त्यांच्या नावासोबत भूमिका, अभ्यासाचे क्षेत्र किंवा आवडी दर्शवणारे टॅग्ज जोडू शकतात. त्यामुळे कार्यस्थळ, शाळा किंवा विविध समुदाय गटांमध्ये सदस्यांची ओळख अधिक स्पष्टपणे करता येणार आहे. सदस्य स्वतः टॅग सेट करू शकतात किंवा टॅग देण्याचा अधिकार फक्त ऍडमिनपुरता मर्यादित ठेवायचा की नाही हे ग्रुप अद्मिण ठरवू शकतात. विशेष म्हणजे, ग्रुप ऍडमिन्ससाठी दाखवले जाणारे टॅग वेगवेगळ्या रंगात दिसतात, ज्यामुळे त्यांच्या भूमिकेची ओळख सहज पटते.

दरम्यान, पायरसीविरोधात केंद्र सरकारने घेतलेली ही कारवाई भविष्यात डिजिटल प्लॅटफॉर्मवरील बेकायदेशीर कंटेन्टवर नियंत्रण आणण्यासाठी महत्वाची पाऊल मनाली जात आहे. तसेच वापरकर्त्यांनी देखील असा पायरेटेड कंटेंटपासून दूर राहावे, अन्यथा कायदशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते, असा इशारा देखील सरकारने दिला आहे.

Exit mobile version