Download App

अमेरिका राष्ट्राध्यक्ष ट्रम्प अन् पंतप्रधान मोदी यांच्यात फोनवर संवाद; कोणत्या मुद्यांवर झाली चर्चा?

इंडो-पॅसिफिक, मध्य पूर्व आणि युरोपमधील सुरक्षा यासारख्या काही प्रमुख प्रादेशिक समस्यांवरही उभय नेत्यांमध्ये चर्चा

  • Written By: Last Updated:

PM Modi Phone Call With Trump : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्यात काल पहिल्यांदाच फोनवरून चर्चा झाली. (PM Modi) डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्याबद्दल ट्रम्प यांनी त्यांचं अभिनंदन केलं. तसंच फेब्रुवारी महिन्यात मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार असल्याचंही यावेळी जाहीर करण्यात आलं.

ट्रम्प यांनी बेकायदेशीर स्थलांतरितांचाही मुद्दा उपस्थित केला. रॉयटर्सने दिलेल्या बातमीनुसार, ‘ट्रम्प यांनी सांगितले की, मोदींशी स्थलांतरितांच्या मुद्द्यावर चर्चा केली. बेकायदेशीर स्थलांतरितांना परत घेण्यासंदर्भात भारत योग्य ती कार्यवाही करेल. तसंच, मोदी फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेचा दौरा करणार आहेत. भारताच्या परराष्ट्र खात्याने मात्र अद्याप यावर अधिकृत भूमिका मांडलेली नाही.

युक्रेन युद्ध थांबणार? युक्रेनला मिळणारी मदत अमेरिका रोखणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबतची माहिती एक्सवर पोस्ट केली आहे. माझे मित्र राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बोलून आनंद वाटला. अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. द्वीपक्षीय संबंधातून दोन्ही देशांचा फायदा आणि विश्वासार्ह भागीदारीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आमच्या लोकांचे कल्याण, जागतिक शांतता, समृद्धी आणि सुरक्षेसाठी आम्ही एकत्र काम करू, असा विश्वास व्यक्त केला, असं मोदींनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.

इंडो-पॅसिफिक, मध्य पूर्व आणि युरोपमधील सुरक्षा यासारख्या काही प्रमुख प्रादेशिक समस्यांवरही उभय नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे रॉयटर्सने म्हटले आहे. भारताने अमेरिकन बनावटीच्या संरक्षण उपकरणांची खरेदी वाढवावी आणि अधिक संतुलित व्यापार संबंध वाढविण्याकडे वाटचाल करावी, असंही ट्रम्प यांनी सांगितलं. पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात पहिल्या टर्मपासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत. ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळात शेवटचा विदेश दौरा भारतात केला होता.

follow us

संबंधित बातम्या