Download App

गेमचेंजर ठरणार PM मोदींचा फ्रान्स दौरा, ‘या’ करारांमुळे वाढणार भारताची ताकद

  • Written By: Last Updated:

PM Modi In France : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर रवाना झाले आहेत. त्यांचा हा सहावा फ्रान्स दौरा असून या दौऱ्यादरम्यान भारत आणि फ्रान्समध्ये होणाऱ्या करारांमुळे भारताची ताकद वाढण्यास मदत होणार असून, मोदींचा हा दौरा गेम चेंजर कसा ठरेल हे आपण समजून घेऊया.

माजी खासदार विजय दर्डांसह सुपुत्राला धक्का; कोळसा खाणवाटप गैरव्यवहारात 6 जण दोषी

भारताच्या २६ जानेवारीप्रमाणेच फ्रान्सच्या बॅस्टिल डे परेडला विशेष महत्त्व असून, मोदी 14 जुलैला होणाऱ्या फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनी बॅस्टिल डे कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. 2009 प्रमाणे या वेळीही फ्रेंच सैन्यासोबतच भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि भारतीय वायुसेनेचे तीन विभाग परेडमध्ये सहभागी होणार असून, फ्रान्सकडून घेण्यात आलेली भारताची तीन राफेल विमाने हवाई पराक्रम सादर करणार आहेत.

या करारांवर होणार स्वाक्षऱ्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यातील द्विपक्षीय चर्चेनंतर काही महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षरी केली जाणार आहे. यात सर्वाधिक महत्त्वाचा करार दोन्ही देशांमधील संरक्षण करार आहे. फ्रान्सकडून घेण्यात येणारे राफेल विमानं सागरी सीमेचे रक्षण करण्यासाठी खरेदी करत आहे. ही विमाने आयएनएस विक्रांत या विमानवाहू नौकेवर तैनात केले जाणार आहे.

Vijay Vadettiwar : फडणवीस आणि अजित पवार हे दोघेही टेरर नेते, पाहू त्यांचं किती काळ जमतं

या दौऱ्यात भारतीय नौदलासाठी 26 राफेल एम व्हर्जनच्या डीलवर शिक्कामोर्तब होणार आहे. याशिवाय स्कॉर्पीन श्रेणीतील 3 पाणबुड्यांच्या खरेदीचा करार होण्याची शक्यता आहे. मेक इन इंडिया कार्यक्रमांतर्गत फ्रान्ससोबतह हेलिकॉप्टर इंजिनचा करार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी पंतप्रधानांच्या अमेरिकन दौऱ्यात अशी इंजिन खरेदी करण्याचा करार झाला होता.

2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचे 6 दौरे केले आहेत आणि यातून भारत-फ्रान्स संबंध अधिक दृढ होत असून, 2019 मध्ये, हडसन संस्थेने त्यांच्या एका संशोधनात फ्रान्सला भारताचा ‘नवा बेस्ट फेंड’ म्हणून संबोधले होते. यापूर्वी 1980 च्या दशकात भारताने फ्रान्सकडून मिराज 2000 हे लढाऊ विमानही खरेदी केले होते. सध्या भारताच्या ताफ्यात एकूण 50 मिराज लढाऊ विमानांचा समावेश आहे. अमेरिकेने पाकिस्तानला F16 देण्याची घोषणा केल्यावर भारताने मिराज खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. राफेल आणि मिराजशिवाय भारताने कारगिल युद्धात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या फ्रान्सकडून जग्वार लढाऊ विमानेही खरेदी केली आहेत.

Tags

follow us