माजी खासदार विजय दर्डांसह सुपुत्राला धक्का; कोळसा खाणवाटप गैरव्यवहारात 6 जण दोषी
दिल्ली : कोळसा खाण वाटपातील अनियमिततेच्या प्रकरणांमध्ये विशेष न्यायालयाने काँग्रेसचे माजी राज्यसभा खासदार विजय दर्डांसह सर्व आरोपींना दोषी ठरवले. या आरोपींच्या शिक्षेवरील सुनावणी 18 जुलैला होणार आहे. आयपीसी कलम 120बी, 420 आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या इतर कलमांखाली न्यायालयाने या सर्वांवर छत्तीसगडमधल्या फतेपुर खाणीचं कंत्राट जेएलडी यवतमाळ एनर्जीला चुकीच्या पद्धतीने मिळवल्याचा ठपका ठेवला आहे. (A special court convicted all the accused, including former Congress Rajya Sabha MP Vijay Darda, in the coal mine allocation irregularities cases.)
Delhi | Special Court convicts all accused in cases relating to irregularities in the allocation of a coal block in Chhattisgarh. Arguements on the quantum of punishment to be held on July 18.
The case involves former Rajya Sabha MP Vijay Darda, his son Devender Darda, ex-Coal…
— ANI (@ANI) July 13, 2023
या प्रकरणात माजी खासदार आणि ‘लोकमत’ माध्यम समूहाचे विजय दर्डा, त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा, कोळसा मंत्रालयाचे माजी सचिव एचसी गुप्ता, केएस क्रोफा आणि के सी सामरिया या दोन अधिकाऱ्यांसह जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड आणि तिचे संचालक मनोज कुमार जयस्वाल या सर्वांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे.
सीबीआयने 27 मार्च 2013 रोजी दाखल केलेल्या आरोपपत्रात या सर्वजणांनी गैरमार्गाने कोळसा खाणी आपल्या ताब्यात घेतल्या, असा आरोप केला होता. 20 नोव्हेंबर 2014 रोजी सीबीआयचा या प्रकरणातील क्लोजर रिपोर्ट स्वीकारण्यास नकार देत या प्रकरणाचा तपास सुरु ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. यावेळी न्यायालयाने दर्डा यांनी पंतप्रधान मनमोहनसिंह यांना लिहिलेल्या पत्रात चुकीच्या पद्धतीने तथ्यांना सादर केल्याचाही ठपका ठेवला होता.