PM Modi On Arvind Kejriwal : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी मंगळवारी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कथित शीशमहालवरून माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा नाव न घेत हल्लाबोल केला आहे.
अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, सरकारने आतापर्यंत लाखो कोटी रुपये वाचवले आहे. ते शीशमहाल बांधण्यासाठी नाहीतर देशाच्या उभारण्यासाठी. तसेच आम्ही गरिबांना खोटी आश्वासने दिली नाही. आम्ही खरा विकास साधला आहे. असं म्हणत त्यांनी नाव न घेता अरविंद केजरीवाल यांच्यावर टिका केली. तसेच त्यांनी यावेळी ‘जकूजी’ या शब्दाचा वापर करतही केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आम्ही 12 कोटींहून अधिक शौचायले बांधून दिली आणि आमच्या बहिणींची, मुलींच्या अडचणी दूर केल्या आहे. मात्र आजकाल काही नेत्यांचे लक्ष घरांमध्ये जकूजीवर, स्टायलिश शॉवर आहे, परतु आमचे लक्ष प्रत्येक घरात पाणी पोहचवण्यावर आहे.
जकूजी म्हणजे काय?
जकूजी हे हॉट टबसाठी वापरले जाणारे ब्रँड नाव आहे तसेच व्हर्लपूल टब बनवणाऱ्या कंपनीचे नाव देखील आहे. बाजारात हॉट टबना जकूजी या व्यापारी नावाने देखील ओळखले जाते. बाजारात यांची किंमत खुप जास्त असते. तसेच जकूजीमधील पाण्याचे दाब वेगवेगळे असतात. जकूजीमध्ये हायड्रोमासेजचा वापर केला जातो, जो स्नायूंना उत्तेजित करतो. जकूजीमधील पाण्याचे तापमान सुमारे 100°F-102°F असते, जे ताणलेल्या स्नायूंना आराम देण्यास मदत करते. जकूजीमध्ये बसल्याने आराम मिळतो आणि स्नायूंना आराम मिळतो. जकूजीमध्ये बसल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि ताण कमी होतो.
खरे ‘बदनामिया’ धनंजय मुंडेचं; दादागिरी ते हडपलेली जमीन, दमानियांचं सडतोड प्रत्युत्तर
तर पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद मोदी म्हणाले की, जेव्हा ताप जास्त असतो तेव्हा लोक काहीही बोलतात,पण जेव्हा निराशा येते तेव्हा लोक खूप काही बोलतात. आमच्या सरकारने आज विविध पावले उचलून लाखो कोटी रुपये वाचवले आहे आणि ते पैसे आम्ही काचेचा महाल बांधण्यासाठी नाही तर देश बांधण्यासाठी वापरले आहे. असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.